अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून; ‘त्या’ व्यक्तीचा खून झाल्याचे निष्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 20:50 IST2022-03-28T20:50:11+5:302022-03-28T20:50:32+5:30

Murder Case : दिनेश केशव पांचाळ (वय ४५) असे मृताचे नाव आहे.

The body of an unidentified man was found; 'That' person was found murdered | अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून; ‘त्या’ व्यक्तीचा खून झाल्याचे निष्पन्न

अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून; ‘त्या’ व्यक्तीचा खून झाल्याचे निष्पन्न

मनोर : दहिसर सफाळे रस्त्यालगत डुंगीपाडा गावाच्या हद्दीत गुरुवारी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह मनोर पोलिसांना सापडला होता. त्याचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून तो ठाणे येथील खोपटमध्ये राहणारा आहे. दिनेश केशव पांचाळ (वय ४५) असे मृताचे नाव आहे.


मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहिसर डुंगीपडा येथे तीन दिवसांपूर्वी एका अनोखळी इसमाचा मृतदेह सापडला होता. त्या गुन्ह्याचा छडा लावण्यास मनोर पोलिसांना यश आले असून त्याचे नाव दिनेश केशव पांचाळ असे असून तो खोपट, ठाणे येथील रहिवासी आहे. त्याचा गळा दाबून व डोक्यावर घाव घालून खून केल्याचा छडा पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी लावला. या प्रकरणात तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात त्याच्या पत्नीचीही चौकशी केली जात आहे.

निर्दयी! चुलत बहिणीच्या प्रियकराचा 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार; गुप्तांगात काठी घातली

Web Title: The body of an unidentified man was found; 'That' person was found murdered