ठाण्यात पुन्हा जळीतकांड; घरासमोर उभ्या केलेल्या दुचाकी जाळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 20:33 IST2018-12-14T20:31:00+5:302018-12-14T20:33:10+5:30
आज सकाळी घोडबदंर येथील पातलीपाडा भागात तीन दुचाकी जळाल्या. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणाचा तपास कासारवडवली पोलिसांकडून सुरू आहे.

ठाण्यात पुन्हा जळीतकांड; घरासमोर उभ्या केलेल्या दुचाकी जाळल्या
ठाणे - ठाण्यातील पाचपाखाडी आणि लोकमान्यनगर परिसरात दुचाकी जळीतकांडची घटना नुकतीच घडलेली असतानाच आज सकाळी घोडबदंर येथील पातलीपाडा भागात तीन दुचाकी जळाल्या. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास कासारवडवली पोलिसांकडून सुरू आहे.
पाचपाखाडी परिसरात काही दिवसांपूर्वीच 9 दुचाकी जाळल्याची घटना घडली होती. जुन्या वादातून दुचाकी जाळण्यात आल्या होत्या. दरम्यान लोकमान्य नगर येथे एका मद्यपीने दुचाकी जाळल्याची घटना ताजी असताना पातलीपाडा येथे एका चाळीत घराजवळ उभ्या केलेल्या तीन दुचाकी जाळण्यात आल्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशा प्रकारे वारंवार घटना घडत असल्याने पोलिसांनी याप्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरु केला आहे. या सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.