भयंकर फसवणूक! दोन मुलांच्या बापाने गुपचूप बदललं लिंग; २ वर्षांनंतर पत्नीला कळलं, कोर्टात म्हणाली..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 14:04 IST2026-01-13T14:03:14+5:302026-01-13T14:04:39+5:30
लग्नाला सात वर्षे झाली, दोन गोंडस मुली पदरात आहेत, सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक घराच्या कर्त्याने म्हणजेच दोन मुलांच्या बाबाने गुपचूप 'लिंग परिवर्तन' करून घेतले.

AI Generated Image
उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यावर विश्वास ठेवणं कठीण जाईल. लग्नाला सात वर्षे झाली, दोन गोंडस मुली पदरात आहेत, सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक घराच्या कर्त्याने म्हणजेच दोन मुलांच्या बाबाने गुपचूप 'लिंग परिवर्तन' करून घेतले. धक्कादायक म्हणजे, पतीने स्त्री होण्याचा निर्णय घेतला आणि दोन वर्षे पत्नीला याचा साधा मागमूसही लागू दिला नाही. आता हा प्रकार उघडकीस येताच पत्नीने न्यायालयात धाव घेत पतीच्या काळ्या कारभाराचा पाढा वाचला आहे.
दोन वर्षांपासून लपवलं होतं 'स्त्री' होण्याचं गुपित
बांसगाव येथील राहणारी पीडित पत्नी आणि तिचा पती यांचा संसार सात वर्षांपूर्वी सुरू झाला होता. पती दिल्लीतील एका नामांकित खासगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे. पत्नीच्या दाव्यानुसार, दोन वर्षांपूर्वी पतीने दिल्लीत जाऊन शस्त्रक्रिया करून घेतली आणि स्वतःचे लिंग बदलले. मात्र, घरी आल्यावर त्याने हे गुपित मोठ्या शिताफीने लपवून ठेवले. अलीकडेच पत्नीच्या हाती काही वैद्यकीय कागदपत्रे लागली आणि त्यातून या सनसनाटी सत्याचा उलगडा झाला.
मित्रांसोबत संबंध ठेवण्यासाठी करायचा सक्ती!
पत्नीने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात पतीवर अत्यंत गंभीर आणि संतापजनक आरोप केले आहेत. "लग्नानंतर काही काळातच पतीचे वागणे विचित्र झाले होते. तो मला मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायचा. स्वतःचे आपल्या पुरुष मित्रांसोबत शारीरिक संबंध होतेच, पण तो मलाही त्यांच्यासोबत संबंध ठेवण्यासाठी भाग पाडायचा," असा खळबळजनक आरोप पीडित पत्नीने केला आहे. इतकेच नाही तर, गेल्या वर्षी पतीने तिला अमानुष मारहाण करून घराबाहेर काढल्याचा दावाही तिने केला आहे.
मुलींच्या भविष्याची काळजी, कोर्टात न्यायासाठी साकडं
पतीने लिंग बदलल्यामुळे आपले वैवाहिक जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून दोन निष्पाप मुलींचे भविष्य टांगणीला लागल्याचे पत्नीचे म्हणणे आहे. तिने कोर्टाकडे पोटगी आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे. दुसरीकडे, पतीने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून पत्नी खोटे बोलत असल्याचा दावा केला आहे. सध्या न्यायालय दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.