धाकधूक वाढली! सेंट रुग्णालयातून कोरोनाबाधित कैदी झाला पसार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 16:25 IST2022-01-27T16:24:30+5:302022-01-27T16:25:21+5:30

Crime News :फुकरान शेख कोरोनाबाधित असल्याने त्याच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु होते.

Tension increased! Run away coronated prisoner from St. Hospital | धाकधूक वाढली! सेंट रुग्णालयातून कोरोनाबाधित कैदी झाला पसार 

धाकधूक वाढली! सेंट रुग्णालयातून कोरोनाबाधित कैदी झाला पसार 

मुंबई - नैसर्गिक विधीसाठी जाण्याच्या बहाण्याने सेंट जॉर्ज रुग्णालयातून कैदी पसार झाल्याने पोलिसांची धाकधूक वाढली आहे. कोरोना बाधित असलेला फुकरान गुलाब शेख (२१) याला विक्रोळी पोलिसांनीचोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर त्याला ठाणे मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याच्या विरोधात एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फुकरान शेख कोरोनाबाधित असल्याने त्याच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज तो बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने वॉर्डमधून बाहेर पडला, तो परत आलाच नाही. 

Web Title: Tension increased! Run away coronated prisoner from St. Hospital