गुरुग्राममध्ये राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादव हिची तिचे वडील दीपक यादव यांनी तीन गोळ्या घालून हत्या केली. ही घटना सेक्टर-५७ येथील त्यांच्या घरात घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी, राधिका स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना दीपक यांनी तिच्यावर तीन गोळ्या झाडल्या. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गावकऱ्यांच्या टोमण्यांमुळे हत्या केल्याचं कारण सांगितलं आहे. मात्र पोलिसांना या प्रकरणात वेगळाच संशय आहे. तपासात दीपक यादव यांचे वार्षिक उत्पन्न लाखोंमध्ये असल्याचं उघड झालं आहे. ते ब्रोकर व्यवसायातून दरवर्षी १५ लाख रुपये कमवत असे आणि भाड्यातून दरमहा ५ ते १० लाख रुपये कमवत असे. गावातील काही लोकांनी दीपक यांना म्हटलं होतं की, त्याची मुलगी तिच्या मनाप्रमाणे काम करते आणि तो एक चांगला बाप नाही. यानंतर दीपक यांनी राधिकाला तिची टेनिस अकॅडमी बंद करण्यास अनेक वेळा सांगितलं, परंतु राधिकाने नकार दिला.
राधिका यादवचं अकाउंट कोणी केलं डिलीट? अचानक 'गायब' झाल्याने वाढलं पोलिसांचं टेन्शन
दीपक यांनी त्यांच्या मुलीच्या करियरवर २.५ कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला होता. राधिकाला महागडे टेनिस रॅकेट, स्पोर्ट्स गियर आणि परदेशात ट्रेनिंग देखील देण्यात आलं होतं. दुखापतीमुळे राधिका गेल्या दोन वर्षांपासून टेनिसपासून दूर होती आणि आता ती सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बनण्याच्या दिशेने काम करत होती.
राधिका फिटनेस, टेनिस आणि रील बनवत असे, ज्यामध्ये तिची आई देखील तिला पाठिंबा देत असे. परंतु तिच्या वडिलांना तिचा हा कल आवडला नाही. आता पोलीस सोशल मीडिया, नातेसंबंध आणि मित्रांची चौकशी करून खरा हेतू शोधत आहेत.राधिकाचे सोशल मीडिया अकाउंट कोणी डिलीट केले याचा तपास सुरू आहे. या हत्या प्रकरणामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
म्युझिक व्हिडीओमुळे संतापले वडील, टेनिस अकॅडमीलाही विरोध; राधिका हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
धक्कादायक घटनेबाबत नवनवीन माहिती समोर येत आहेत. पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, राधिकाचा एक म्युझिक व्हिडीओ ज्यावरून तिचे वडील खूप रागावले होते, ते यामागचं एक प्रमुख कारण असू शकतो. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू राधिका यादवने सेक्टर ५७ मध्ये स्वतःची टेनिस अकॅडमी चालवण्याचं तिचं स्वप्न पूर्ण केलं होतं. परंतु तिचे वडील दीपक यादव, जे माजी बँक कर्मचारी होते, ते याच्या विरोधात होते. मुलीच्या कमाईवरून लोक त्यांची खिल्ली उडवत असल्याने ते नाराज होते.