The teacher's father tried to kill the intoxicated boy by putting an iron rod in his head | बिंग फुटले! शिक्षक वडिलांनी नशेबाज मुलाचा लोखंडी रॉड डोक्यात घालून केला खुनाचा प्रयत्न

बिंग फुटले! शिक्षक वडिलांनी नशेबाज मुलाचा लोखंडी रॉड डोक्यात घालून केला खुनाचा प्रयत्न

ठळक मुद्देराजेंद्र हिंदुराव गाडेकर यांनी आपला मुलगा प्रतीक गाडेकर (वय 22) याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून करण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मुलाच्या खुनाच्या प्रकरणी राजेंद्र गाडेकर यांना अटक करण्यात आली आहे.

सांगली - नशेबाज मुलाच्या नाहक मागण्यांच्या त्रासाला कंटाळून एका शिक्षक असलेल्या बापाने आपल्या मुलाच्या हत्येचा प्रयत्न करत हल्ला अज्ञातांनी केल्याचा बनाव केला. हा धक्कादायक प्रकार सांगलीमध्ये घडला आहे. या प्रकरणी राजेंद्र गाडेकर (५३) या शिक्षक पित्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी फिर्यादी या त्यांच्या पत्नी आहेत. या दाम्पत्याचा जखमी मुलगा प्रतीक गाडेकर याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सांगलीच्या 100 फुटी रोड येथील रामकृष्ण परमहंस सोसायटी येथे राहणाऱ्या राजेंद्र हिंदुराव गाडेकर यांनी आपला मुलगा प्रतीक गाडेकर (वय 22) याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मुलगा प्रतीक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मिरजेच्या मिशन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मुलाच्या खुनाच्या प्रकरणी राजेंद्र गाडेकर यांना अटक करण्यात आली आहे.

आपल्या खात्यावर साडे तीन लाख रुपये जमा करावे, बंगला नावावर करावा, अशा मागण्यांच्या तगाद्यामुळे राजेंद्र गाडेकर यांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते आणि कुणीतरी त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला असे भासवून पोलिसाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आरोपी शिक्षकाने केला. मात्र, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे आणि त्यांच्या पथकाने या घटनेमागील सत्यता बाहेर आली आणि शिक्षक पित्याचे बिंग फुटले.
 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मास्क नसल्यानं रोखलं तर महिलेचीच 'शिरजोरी'; म्हणे, तुमच्यासारख्या पोलिसांना विकास दुबे गोळ्या घालायचा!

 

बँकेची नोकरी सोडून बनला दरोडेखोरांचा कर्दनकाळ; या 'सिंघम'ने 57 जणांना दाखवला जेलचा रस्ता

 

कोण आहे अस्मिता, जिच्यावर पाळत ठेवून उत्तर प्रदेश पोलीस माहिती खोदून काढतायेत 

 

Video : मुंबईच्या रस्त्यावर हायप्रोफाईल ड्रामा; तिनं नवऱ्याला दुुसऱ्या स्त्रीसोबत पाहिलं, गाडीबाहेर खेचून मारलं!

 

Vikas Dubey Encounter : विकास दुबेच्या साथीदारांना कानपूर पोलीस विमानाने नेणार

 

वडिलांनी गरोदर मुलीची केली हत्या, दफन केलेला मृतदेह बाहेर काढल्यानंतर समोर आले सत्य 

 

दुष्काळात तेरावा महिना! मेडिकलमध्ये औषध घ्यायला गेलेल्या आजोबांच्या पेन्शनच्या पैशावर चोरट्यांनी मारला डल्ला 

Web Title: The teacher's father tried to kill the intoxicated boy by putting an iron rod in his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.