मास्क नसल्यानं रोखलं तर महिलेचीच 'शिरजोरी'; म्हणे, तुमच्यासारख्या पोलिसांना विकास दुबे गोळ्या घालायचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 02:29 PM2020-07-13T14:29:02+5:302020-07-13T14:30:53+5:30

विकास दुबे तुमच्यासारख्या माणसांना गोळ्या घालतात असे या महिलेने वाहन तपासणी करणाऱ्या पोलिसांना म्हटले.

when the woman without mask stopped by said vikas dubey used to kill policemen like you | मास्क नसल्यानं रोखलं तर महिलेचीच 'शिरजोरी'; म्हणे, तुमच्यासारख्या पोलिसांना विकास दुबे गोळ्या घालायचा!

मास्क नसल्यानं रोखलं तर महिलेचीच 'शिरजोरी'; म्हणे, तुमच्यासारख्या पोलिसांना विकास दुबे गोळ्या घालायचा!

Next
ठळक मुद्देही महिला बराच वेळ पोलिसांशी वाद घालत राहिली. सीओ कोतवालीला स्पष्टीकरण दिल्यानंतर महिलेने पोलिसांकडे माफी मागितली.कानपूर ग्रामीण भागात ही महिला रानिया येथे आपल्या फॅक्टरीत जात होती.

रविवारी दुपारी कानपूरच्या कोतवालीच्या चार रस्त्यावर संतप्त महिला व्यावसायिकाची वाहन तपासणी दरम्यान मास्क न लावल्यामुळे गाडी थांबविली म्हणून पोलिसांशी शाब्दिक चकमक झाली. विकास दुबे तुमच्यासारख्या माणसांना गोळ्या घालतात असे या महिलेने वाहन तपासणी करणाऱ्या पोलिसांना म्हटले.

ही महिला बराच वेळ पोलिसांशी वाद घालत राहिली. सीओ कोतवालीला स्पष्टीकरण दिल्यानंतर महिलेने पोलिसांकडे माफी मागितली. पोलिसांनी महिलेला कारवाई न करता सोडले. लॉकडाऊन दरम्यान कोतवाली पोलीस  मोठ्या चाररास्ता येथे वाहन तपासणी मोहीम राबवित आहेत.

चालक आणि मागील सीटवर बसलेली महिला कारमध्ये मास्क न घालता प्रवास करताना पोलिसांना त्यांना थांबवले. यामुळे संतापलेल्या या महिलेने स्वत: ला अ‍ॅडव्होकेट आणि उद्योगपती म्हणवून पोलिसांना अडकवा करण्याचा प्रयत्न केला. महिला पोलिसाने मास्क न लावण्याबाबत आणि नंबर प्लेट योग्य नसल्याप्रकरणी चलनचे पैसे देण्यास सांगितले. 

त्यावेळी या महिलेने रागाने पोलिस पोलीस अधिकाऱ्याला विकास दुबेचे नाव घेत अशा पोलिसांना गोळ्या घातल्या पाहिजे असे सांगितले. महिला पोलीस अधिकाऱ्याने सीओ कोतवाली राजेश कुमार पांडे यांच्याकडे तक्रार केली. घटनास्थळी दाखल झालेल्या सीओने महिलेला समजावून सांगून मास्क घालण्यास सांगितलं. यानंतर, या महिलेने पोलिसांकडे माफी मागितली. कोतवाली प्रभारी संजीव कांत म्हणाले की, महिलेने माफी मागितल्याने कारवाई न करता सोडून देण्यात आले. कानपूर ग्रामीण भागात ही महिला रानिया येथे आपल्या फॅक्टरीत जात होती.

 

Web Title: when the woman without mask stopped by said vikas dubey used to kill policemen like you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.