Teacher has Rape of a female student taking advantage of poverty in pune | शिक्षक बनला हैवान! गरिबीचा गैरफायदा घेत केला विद्यार्थिनीवर बलात्कार

शिक्षक बनला हैवान! गरिबीचा गैरफायदा घेत केला विद्यार्थिनीवर बलात्कार

ठळक मुद्दे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करियर गायडन्स करणार्‍या कॅप्टन मनाल कोचिंग क्लासेसमध्ये मोसीन शेख हा शिक्षक आहे. कौसरबागेतील क्लासमध्ये येण्यास सांगितले. त्यानुसार ही तरुणी आईला घेऊन क्लासमध्ये मोसीन शेख याला भेटली.

पुणे : क्लाससाठी भरायला पैसे नसतील तर मर्चंट नेव्हीच्या कोर्सचा खर्च करतो, असे आमिष दाखवून तरुणीवर मित्राच्या फ्लॅटवर नेऊन क्लासच्या शिक्षकाने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कसबा पेठेत राहणार्‍या एका १८ वर्षाच्या तरुणीने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी मोसीन शेख (वय ३२, रा. कौसरबाग, कोंढवा खुर्द) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोंढव्यातील अशोक म्युज येथे १० जुलै रोजी दुपारी १२ वाजता घडला.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करियर गायडन्स करणार्‍या कॅप्टन मनाल कोचिंग क्लासेसमध्ये मोसीन शेख हा शिक्षक आहे. या तरुणीने नुकतीच बारावीची परिक्षा दिली आहे. त्याचा निकाल येणे बाकी आहे़ गेल्या वर्षी ऑक्टोबर २०१९ मध्ये मोसीन शेख याने त्यांच्या कॉलेजमध्ये करिअर गाईडन्सवर लेक्चर दिले होते़ त्यावेळी त्यांनी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आपला मोबाईल नंबर दिला होता़ या तरुणीला मर्चंट नेव्हीचा कोर्स करायचा होता. त्यासाठी तिने ४ जुलै रोजी मोसीन शेख याला फोन केला़ त्यांनी


कौसरबागेतील क्लासमध्ये येण्यास सांगितले. त्यानुसार ही तरुणी आईला घेऊन क्लासमध्ये मोसीन शेख याला भेटली. त्याने इटंरन्स परिक्षेचा फॉर्मचे १२०० रुपये आणि क्लासचे ७ हजार रुपये फी सांगितली. ८ जुलैला क्लास सुरु झाला. पण ही तरुणी पैसे भरु शकत नसल्याने क्लासला गेली नाही. त्यामुळे शेख याने तिच्याशी संपर्क साधला. तेव्हा या तरुणीने क्लासची फी जास्त आहे. आमच्या घरची परिस्थिती गरीब आहे. मी क्लासला येऊन शकत नाही, असे तिने सांगितले. त्यावर त्याने दुसर्‍या दिवशी आपण पत्नीला सोडायला कुंभारवाडा येथे येणार असल्याचे सांगून तेथे बोलावले. दुसर्‍या दिवशी कुंभारवाड्याहून तिला त्याने आपल्या कारमध्ये घेतले. तिला फीचे मी पाहतो, असे सांगून क्लासवर आणले. तेथे तिला कारमध्येच थांबवून तो वर गेला. थोडा वेळाने परत खाली आला. कारमध्ये बसवून अशोका म्युज येथे मित्राकडे काम असल्याचे सांगून तिला घेऊन गेला. तेथे त्याने या तरुणीवर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर तिला ही गोष्ट कोणाला सांगू नको, म्हणून धमकावले़ दुसर्‍या दिवशी या तरुणीने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. कोंढवा पोलीस मोसीन शेख याचा शोध घेत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मास्क नसल्यानं रोखलं तर महिलेचीच 'शिरजोरी'; म्हणे, तुमच्यासारख्या पोलिसांना विकास दुबे गोळ्या घालायचा!

 

बँकेची नोकरी सोडून बनला दरोडेखोरांचा कर्दनकाळ; या 'सिंघम'ने 57 जणांना दाखवला जेलचा रस्ता

 

कोण आहे अस्मिता, जिच्यावर पाळत ठेवून उत्तर प्रदेश पोलीस माहिती खोदून काढतायेत 

 

 

Web Title: Teacher has Rape of a female student taking advantage of poverty in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.