शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 13:20 IST2025-05-03T13:17:00+5:302025-05-03T13:20:12+5:30

Teacher run away with student: एक २३ वर्षाची शिक्षिका १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेल्याचे प्रकरण समोर आले. शिक्षिकेने विद्यार्थ्याचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल झाला. पण, तपास केल्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षिकेचे वेगवेगळेच संबंध समोर आले.

Teacher had an affair with a 13-year-old student, even ran away; Manasi said, 'His baby is in my womb' | शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'

शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'

Teacher Student News: २३ वर्षाची शिक्षिका आणि १३ वर्षाचा विद्यार्थी...विद्यार्थी शिक्षिकेकडे कोचिंग क्लाससाठी जायचा, पण तिथेच शिक्षिकेचे आणि त्याचे सूत जुळले. दोघांमध्येही शरीरसंबंधही झाले. त्यानंतर शिक्षिका १३ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार झाली. कोचिंग क्लासला गेलेला मुलगा घरीच परतला नाही म्हणून कुटुंबीयांनी शोधा शोध केला. नंतर पोलीस ठाण्यात बेपत्ता आणि अपहरणाची तक्रार देण्यात आली. शिक्षिका विद्यार्थ्याला घेऊन पळून गेल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांचा ठावठिकाणा शोधला. त्यानंतर केलेल्या चौकशी धक्कादायक गोष्टी समोर आल्या. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

गुजरातमधील सूरत शहरात ही घटना घडली आहे. २३ वर्षाची शिक्षिका मानसीकडे १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा कोचिंग क्लास लावलेला होता. विद्यार्थी दररोज तिच्या घरी शिकवणीसाठी जायचा. २५ एप्रिल रोजी तो घरी परत आलाच नाही. त्यानंतर कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. 

वाचा >>'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल

शिक्षिका विद्यार्थ्यासोबत जाताना दिसली

पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. त्यात शिक्षिका विद्यार्थ्याला सोबत घेऊन जाताना दिसली. त्यांना शोधण्यासाठी चार पोलीस पथके तयार करण्यात आली. पोलिसांना माहिती मिळाली की, दोघेही जयपूर आणि उदयपूरवरून गुजरातला येत आहे.   त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना पकडले. 

विद्यार्थ्यासोबत शिक्षिका दिल्ली आणि उत्तर प्रदेश आली फिरून

सूरतचे पोलीस उपायुक्त भागीरथ गढवी यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, "२५ एप्रिल रोजी शहरातून जाण्यापूर्वी दोघांनी शॉपिंग केली. त्यानंतर दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी गेले. बडोद्याला गेले. नंतर अहमदाबाद. त्यानंतर ते दिल्लीला गेले. तिथेही खरेदी केली. वृंदावनला गेले, दर्शन केले आणि त्यानंतर जयपूरला आले. त्यांना तिथे राहायचं होतं, पण काही जमलं नाही आणि ते गुजरातला आले."

शिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबत अनेक महिन्यापासून शरीरसंबंध

पोलिसांनी शिक्षिकेला अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केली. तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे रिपोर्टमधून कळले. 

शिक्षिकेने पोलिसांना सांगितले की, ती आणि विद्यार्थ्यी अनेक महिन्यांपासून सोबत आहेत. त्या दोघांमध्ये शरीरसंबंधही झाले आहेत. 'माझ्या गर्भात असलेले बाळ त्या विद्यार्थ्याचेच आहे', असा दावा शिक्षिकेने केला आहे. त्यामुळे अपहरणाच्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. ते बाळ नक्की कुणाचे यासाठी पोलिसांकडून आता डीएनए चाचणी केली जाणार आहे.

Web Title: Teacher had an affair with a 13-year-old student, even ran away; Manasi said, 'His baby is in my womb'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.