होमवर्क न केल्यानं शिक्षकानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सातवीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 10:48 AM2021-10-21T10:48:24+5:302021-10-21T10:50:03+5:30

गणेशनं त्याच्या वडिलांना १५ दिवसापूर्वी सांगितलं होतं की, त्याचे शिक्षक मनोज विनाकारण त्याला मारहाण करतात

The teacher beaten student due to not complete his homework; The unfortunate death of student | होमवर्क न केल्यानं शिक्षकानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सातवीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

होमवर्क न केल्यानं शिक्षकानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सातवीच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देगणेशला पाहिलं तेव्हा हा बेशुद्ध झालाय की त्याचा मृत्यू झालाय? असं आरोपी शिक्षकाला विचारला. शिक्षकाने तो मरण्याचं नाटक करतोय असं सांगितलेमनोजने गणेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर जमिनीवर आपटून मारलं.

नवी दिल्ली – अनेकदा विद्यार्थी शाळेचा अभ्यास करत नाही म्हणून त्यांना शिक्षकांची छडी मिळाल्याचं ऐकलं असेल. परंतु  राजस्थानच्या चूरु जिल्ह्यात सालासरच्या कोलासर इथं ह्द्रयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी खासगी शाळेत ७ वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याची शिक्षकाने निर्दयी मारहाण करण्यात आली आहे. या मुलाने होमवर्क केला नाही इतकाच याचा गुन्हा होता.

होमवर्क न करता शाळेत का आलास? म्हणून शिक्षकाचा राग अनावर झाला. त्याने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. सालासर पोलीस एसएचओ संदीप बिश्नोई म्हणाले की, कोलासर रहिवासी ओमप्रकाश यांनी तक्रार दाखल केली आहे. ओमप्रकाश यांचा मुलगा गणेश खासगी शाळा मॉर्डन पब्लिक स्कूलमध्ये सातवीच्या वर्गात शिकतो. गेल्या २-३ महिन्यापासून तो शाळेत जात आहे. गणेशनं त्याच्या वडिलांना १५ दिवसापूर्वी सांगितलं होतं की, त्याचे शिक्षक मनोज विनाकारण त्याला मारहाण करतात. बुधवारी गणेश शाळेत गेला होता. तेव्हा जे घडलं त्याने गणेशच्या कुटुंबाला धक्काच बसला.

सकाळी सव्वा नऊच्या सुमारास गणेशचे वडील ओमप्रकाश यांना शाळेतील शिक्षक मनोज यांचा फोन आला, ते म्हणाले की, गणेश होमवर्क न करता वर्गात बसला होता. त्यामुळे त्याला मारलं त्यात तो बेशुद्ध झाला आहे. शेतात काम करणारे वडील तातडीने शाळेत धावत आले. त्यांनी गणेशला पाहिलं तेव्हा हा बेशुद्ध झालाय की त्याचा मृत्यू झालाय? असं आरोपी शिक्षकाला विचारला. तेव्हा शिक्षकाने तो मरण्याचं नाटक करतोय असं सांगितले. वडील आरोपी शिक्षकाला जाब विचारत होते तेव्हा गणेशची आईही तिथे उपस्थित झाली. शाळेतील बाकीचे मुलं खूप घाबरलेल्या अवस्थेत होती.

वर्गातील मुलांनी सांगितले की, मनोजने गणेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर जमिनीवर आपटून मारलं. या मारहाणीत गणेशला प्रचंड मार बसला असं ते म्हणाले. कुटुंबीय शाळेत पोहचल्यानंतर जखमी अवस्थेत गणेशला सालासरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. याठिकाणी डॉक्टरांनी गणेशला मृत घोषित केले. मृत गणेशच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन शिक्षक मनोज कुमार याच्याविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कारवाईत आरोपी शिक्षकाला अटक केली. गणेशच्या मृतदेहावर पोस्टमोर्टम करुन मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.

Read in English

Web Title: The teacher beaten student due to not complete his homework; The unfortunate death of student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.