शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! विद्यार्थिनीला शिक्षक पाठवायचा अश्लील मेसेज; घरच्यांनी शिकवला चांगलाच धडा, केली यथेच्छ धुलाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 13:05 IST

Crime News : विद्यार्थिनीला मोबाईलवर शाळेतील शिक्षक अश्लील मेसेज पाठवत होता. यामुळे त्रस्त झालेल्या मुलीने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला आणि धक्कादायक प्रकार उघड झाला. 

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेतील विद्यार्थिनीला शिक्षकच अश्लील मेसेज पाठवत असल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. मुलीच्या घरच्यांशी आरोपी शिक्षकाला चांगलाच धडा शिकवला असून त्याची यथेच्छ धुलाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या सीकर जिल्ह्यात ही लज्जास्पद घटना घडली आहे. विद्यार्थिनीला मोबाईलवर शाळेतील शिक्षक अश्लील मेसेज पाठवत होता. यामुळे त्रस्त झालेल्या मुलीने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला आणि धक्कादायक प्रकार उघड झाला. 

मुलीने भयंकर प्रकार सांगितल्यानंतर संतापलेल्या कुटुंबीयांनी शिक्षकाची धुलाई केली आहे. फतेहपूरच्या मारडाटू गावात एक सरकारी शाळा आहे. या शाळेतील गणिताच्या शिक्षकाने हे कृत्य केलं आहे. सुरेश कुमार असं या आरोपीचं नाव आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोपी शिक्षकाला पकडलं आणि मारहाण केली आहे. देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन क्लाससाठी शिक्षकांकडे सर्व विद्यार्थ्यांचे फोन नंबर आहेत. 

दहावीच्या विद्यार्थिनीचा मोबाईल नंबर हा ऑनलाईन क्लास अटेंड करण्यासाठी शिक्षकाकडे देण्यात आला होता. मात्र सुरेश कुमार यांने त्यानंतर विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मुलीला वाटलं की चुकून असा मेसेज सेंड झाला असेल. मात्र त्यानंतर सातत्याने असे अश्लील मेसेज मुलीला येऊ लागले. हा प्रकार वाढल्याने तिने आपल्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. मुलीच्या नातेवाईकांनी आरोपीला पकडलं आणि मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करण्यात येत आहे. 

बंदुकीसोबत सेल्फी काढणं पडलं महागात, नवविवाहितेचा मृत्यू पण माहेरच्यांनी केला धक्कादायक खुलासा

 उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बंदुकीसोबत सेल्फी काढणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. तिला आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या माहेरच्यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. हुंड्यासाठी आपल्या मुलीचा प्रचंड छळ करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच दोन लाखांसाठी सासरची म़ंडळी तिला खूप त्रास देत असल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तरुणीचे वडील राकेश कुमार यांनी मुलीचा पती आकाश आणि सासू-सासरे यांच्या विरोधात हुंड्यासाठी 2 लाख रुपये मागून अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानIndiaभारतPoliceपोलिसTeacherशिक्षकStudentविद्यार्थी