आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 13:20 IST2025-11-09T13:17:26+5:302025-11-09T13:20:34+5:30
यासंदर्भात पोलिसांनी म्हटले आहे की, पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून दोषींविरुद्ध कठोर पावले उचलली जातील.

प्रतिकात्मक फोटो...
तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण राज्यच हादरले आहे. एका महिलेला तिच्या समलैंगिक साथीदारासह, सहा महिन्यांच्या चिमुकल्याच्या हत्येच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई त्या चिमुकल्याच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली. चिमुकल्याचा मृत्यू नैसर्गिक नसून घडवून आणला गेला असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. सुरुवातीला पोलिसांनी दूध पाजताना मृत्यू झाल्याचे समजून नैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती आणि शवविच्छेदन न करताच मृतदेह कुटुंबाच्या शेतात पुरण्यात आला होता.
ही घटना याच महिन्याच्या सुरुवातीला घडली. काही दिवसांनी संबंधित चिमुकल्याच्या वडिलांनी पोलिसांशी संपर्क साधून, "आपल्या पत्नीचे एका दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध आहेl. यासंदर्भातील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ आपल्या हाती लागले आहेत. या नात्याच्या दबावामुळेच चिमुकल्याचा बळी गेला असावा, असा संशय आपल्याला आहे," असे सांगितले.
यानंतर, पोलिसांनी संबंधित चिमुकल्याचे शव पुन्हा बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. याच्या अहवालात धक्कादायक खुलासा झाला. चिमुकल्याला दाबून आणि गळा आवळून ठार मारल्याचे समोर आले. चौकशीत आरोपी महिलेने कबूल केले की तिला आपल्या नवऱ्याचे मूल नको होते आणि त्यांच्या वैवाहिक नात्यात मतभेद होते.
यासंदर्भात पोलिसांनी म्हटले आहे की, पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून दोषींविरुद्ध कठोर पावले उचलली जातील.