Tadipar goons brutally murdered in Pune | पुण्यात तडीपार गुंडाची निर्घुण हत्या, पहाटेच्या घटनेनं सर्वत्र खळबळ

पुण्यात तडीपार गुंडाची निर्घुण हत्या, पहाटेच्या घटनेनं सर्वत्र खळबळ

पुणे : खराडी येथील तडीपार गुंड शैलेश घाडगे याचा सोमवारी पहाटे तीक्ष्ण हत्याराने वार करुन खुन करण्यात आल्याचे उघडकीस आले. युवान आय टी पार्क जवळील नैवेद्यम हॉटेल शेजारील मोकळ्या जागेत हा प्रकार सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास लक्षात आला. 

शैलेश दत्तात्रय घाडगे (वय ३५) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. घाडगे हा चंदननगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध खुन, खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल आहेत़ पोलिसांनी त्याला तडीपार केले होते. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली होती.
घाडगे याच्यावर हल्लेखोरांनी वार करुन डोक्यात दगड घालून त्याचा खुन केल्याचे निष्पन्न झाले आहे. सकाळी फिरायला आलेल्या लोकांना हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांच्यापैकी एकाने पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती कळविली. चंदननगर पोलीस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरु आहे.

Web Title: Tadipar goons brutally murdered in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.