नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार, कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 18:25 IST2021-12-30T18:16:03+5:302021-12-30T18:25:16+5:30
Court Rejects Nitesh rane's Anticipatory Bail : आमदार नितेश राणे यांना न्यायालयाकडून दणका

नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार, कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला
सिंधुदुर्ग: शिवसेनेचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता त्याची सुनावणी गेले तीन दिवस सुरू आहे आज गुरुवारी याबाबत अंतिम निकाल येणे अपेक्षित होता त्याप्रमाणे अंतिम निकाल आला असून न्यायालयाने राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत दणका दिला आहे.
महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता परिसरात करण्यात आला होता याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहाजणांना अटक केली होती यातील मुख्य सूत्रधार हा सचिन सातपुते असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्या वरूनच पोलिसांकडून आमदार नितेश राणे याच्या अटकेची तयारी केली होती तत्पूर्वी त्याची नोटीस देऊन चौकशी ही करण्यात आली होती.
मात्र आमदार राणे यांनी पोलीस कारवाई पूर्वी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता याची सुनावणी गेले तीन दिवस सुरू होती मात्र यावर निर्णय झाला नव्हता आज यावर अंतिम निकाल देण्याचे न्यायालयाने बुधवारी सांगितले होते त्याप्रमाणे सकाळपासूनच काय निकाल न्यायालय देईल याची उत्सुकता शिगेला ताणली होती त्याप्रमाणे संध्याकाळी उशीरा त्याबाबतचा निर्णय आला असून यात आमदार नितेश राणे यांना दणका दिला असून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.