शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्विस बँकेत अकाऊंट, मुलींना अडकवण्याचे प्रशिक्षण; ७० वर्षाच्या छांगुर बाबानं आणखी काय काय केलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 10:42 IST

Chhangur Baba Crime : छांगुर बाबा आता मनी लॉन्ड्रिंग, धर्मांतरण, हवाला व्यवहार आणि परदेशी फंडिंग सारख्या गंभीर प्रकरणांमध्ये अडकला आहे.

जमालुद्दीन ऊर्फ 'छांगुर बाबा'ची चौकशी जसजशी पुढे जात आहे, तसतसे त्याच्या काळ्या कारनाम्यांचे वेगवेगळे पदर उघड होत आहेत. ४०००हून अधिक लोकांचे धर्मांतरण करणाऱ्या या बाबावर अंमलबजावणी संचालनालय (ED), दहशतवादविरोधी पथक (ATS) आणि आयकर विभाग (Income Tax Department) सारख्या सर्वोच्च तपास यंत्रणांनी कारवाई सुरू केली आहे. छांगुर बाबाचा सर्वात जवळचा सल्लागार अब्दुल मोहम्मद राजा मुलींना फसवण्याचे प्रशिक्षण देत होता, तर छांगुर बाबाचा साथीदार नवीन रोहरा याचे स्विस बँकेतही खाते असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बलरामपूर जिल्ह्यात स्वतःला 'पीर बाबा' म्हणून मिरवणारा छांगुर बाबा आता मनी लॉन्ड्रिंग, धर्मांतरण, हवाला व्यवहार आणि परदेशी फंडिंग सारख्या गंभीर प्रकरणांमध्ये अडकला आहे. यूपी एटीएसच्या एफआयआरनंतर आता अंमलबजावणी संचालनालयानेही त्याच्या काळ्या कमाईची आणि फसवणुकीची पाळेमुळे शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.

धर्मांतरणाचे जाळे असे पसरवले जात होते!एटीएसच्या एफआयआरमध्ये धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. बाबाने 'शिजरा-ए-तय्यबा' नावाच्या पुस्तकाद्वारे दलित, गरीब आणि महिलांना इस्लाम स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केले. त्याच्या धार्मिक प्रवचनांमध्ये असे घटक होते, जे लोकांच्या मनात संभ्रम आणि असंतोष निर्माण करत होते. तपासात असे समोर आले आहे की, त्याने ३ ते ४ हजार हिंदूंना लक्ष्य करून त्यांना बळजबरीने किंवा आमिष दाखवून इस्लाममध्ये सामील केले आहे. यात सुमारे १५००हून अधिक महिलांचा समावेश होता.

४० बनावट संस्था आणि १०० हून अधिक बँक खातीईडीच्या तपासात असे समोर आले आहे की, छांगुर बाबा आणि त्याच्या साथीदारांनी ४० हून अधिक बनावट एनजीओ (NGO) आणि संस्था बनवल्या आणि त्यांच्या नावावर १०० हून अधिक बँक खाती उघडली. या खात्यांमध्ये अरब देशांतून कोट्यवधी रुपये हस्तांतरित करण्यात आले. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, ही खाती मध्य पूर्व, दुबई आणि ओमान सारख्या देशांतून परदेशी देणगी कायद्याचे (Foreign Contribution Act) उल्लंघन करत निधी प्राप्त करत होती. ईडीने या खात्यांची माहिती संबंधित बँकांकडून मागवली आहे आणि लवकरच या सर्व मालमत्ता मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) जप्त करण्याची तयारी सुरू आहे.

१०० कोटींहून अधिकची अवैध मालमत्ताबाबाने बहराइच, बलरामपूर, नागपूर आणि पुणे यासह अनेक शहरांमध्ये अवैधपणे मालमत्ता खरेदी केल्या. परवानगीशिवाय अनेक बांधकामे केली. बलरामपूरमधील त्याची आलिशान कोठी जिल्हा प्रशासनाने ३० तासांच्या कारवाईनंतर जमिनीदोस्त केली. स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे की, ही कोठी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बांधण्यात आली होती.

स्विस बँक ते दुबईपर्यंत पसरलेले जाळे!ईडी आणि एटीएसला छांगुर बाबाचा साथीदार नवीन रोहरा याच्या हालचालींवरही संशय आहे. नवीन काही काळापूर्वी दुबईतून परतल्यानंतर बलरामपूरमध्ये जमिनी खरेदी करत होता. तपासात असे दिसून आले आहे की, त्याच्या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांची परदेशी रक्कम हस्तांतरित झाली आणि हेच पैसे नंतर बाबा, नीतू आणि महबूब यांच्या खात्यांमध्ये पाठवले गेले. स्विस बँकेतही नवीनचे खाते असल्याची माहिती मिळाली आहे, ज्याचा तपास आता आंतरराष्ट्रीय एजन्सींच्या सहकार्याने पुढे जाईल.

अब्दुल मोहम्मद राजा देत होता प्रशिक्षणछांगुर बाबाचा सर्वात जवळचा सल्लागार अब्दुल मोहम्मद राजा देखील तपासाच्या कक्षेत आहे. माहितीनुसार, तो केवळ बाबाला धर्मांतरणाचे मार्ग समजावत नव्हता, तर मुलींना फसवण्याचे प्रशिक्षणही देत होता. याचा उद्देश असा होता की, मुलगी एखाद्या मुस्लिम युवकाच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून सहजपणे धर्म बदलू शकेल. अब्दुलच्या बँक खात्यांमध्येही कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. एटीएस आता त्याला अटक करण्याचा प्रयत्न करत आहे.

इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईलची तपासणीईडीने बाबाच्या मागील सहा महिन्यांच्या आयकर रिटर्नची माहिती आयकर विभागाकडून मागवली आहे. मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. सूत्रांनुसार, या उपकरणांमध्ये धर्मांतरणाशी संबंधित व्हिडीओ, संपर्क सूत्रे आणि व्यवहाराचा संपूर्ण डेटा मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश