Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 08:26 IST2025-09-25T08:23:57+5:302025-09-25T08:26:44+5:30
Swami Chaitanyananda Saraswati News: दिल्लीतील वासनांध बाबाचे कारनामे समोर येत असून, दिल्लीसह देशभरात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. या बाबाचे अनेक कारनामे आता उजेडात येत आहेत.

Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी
Swami Chaitanyananda saraswati news in marathi: दिल्लीतील प्रसिद्ध आश्रमात शिक्षण घेणार्या विद्यार्थिनींनाच स्वयंघोषित स्वामी चैतन्यानंद सरस्वती आपल्या वासनेची शिकार बनवत होता. पीडित मुलींनी तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाने खळबळ उडाली. बाबाने ज्या मुलींना शय्यासोबत करण्यासाठी धमकावले होते. त्या मुलीच्या मोबाईलमधील संभाषण आधीच डिलीट केले गेले आहे. त्यामुळे त्या मोबाईलची आता तपासणी केली आहे. दरम्यान, सध्या स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार असून, त्याला पकडण्यासाठी पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. बाबा सातत्याने त्याचं ठिकाण बदलत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बाबा चैतन्यानंद सरस्वतीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप अनेक मुलींनी केला आहे. बाबा मुलींना व्हॉट्सअपवर मेसेज करायचा. खोलीत बोलवायचा. माझ्यासोबत शय्यासोबत कर तुला परदेशात फुकट फिरायला घेऊन जातो, असेही म्हणायचा.
५० मोबाईलमधील चॅट, बाबाचे कारनामे
पोलिसांनी ५० मुलींच्या मोबाईलची तपासणी केली आहे. पण, पोलिसांनी ५० मोबाईलमधीलही बाबासोबतचे संभाषण डिलीट केलेले मिळाले आहे. प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली आहे की, बाबा मुलींना धमक्या देऊन संभाषण डिलीट करायला लावायचा. त्यामुळे पोलीस आता व्हॉट्सअपवरील सर्व संभाषण परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
स्वामी चैतन्यानंद सरस्वतीविरोधात लुक आऊट नोटीस
हे प्रकरण समोर आल्यानंतर बाबा फरार झाला. काही लोक त्याला मदत करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांची पथके दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरयाणा, उत्तराखंड राज्यात शोध घेत आहे. ज्या ठिकाणी बाबा लपला असण्याची शंका पोलिसांना होती, त्या सर्व ठिकाणी आता छापेमारी केली जात आहे. पोलिसांनी बाबाविरोधात लुक आऊट नोटिसही काढली आहे.
मठाने स्वामी चैतन्यानंद सरस्वतीविरोधात दिली तक्रार
पीडित मुलींबरोबर डर्टी बाबाविरोधात मठानेच दिल्ली पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. २००९ मध्येही स्वामी चैतन्यानंद सरस्वतीविरोधात एक गुन्हा दाखल झालेला होता. हा बाबा आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या मुलींनाच हेरायचा आणि त्यांना वासनेची शिकार बनवायचा.