अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा संशयास्पद मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 16:13 IST2021-10-12T16:00:17+5:302021-10-12T16:13:28+5:30
Suspicious death of a woman : 30 फूट उंचीवरून ढकल्याचा संशय; अपार्टमेंटमध्ये मसाज पार्लर

अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा संशयास्पद मृत्यू
कोल्हापूर : राजारामपुरी 11वी गल्लीत तवनाप्पा पाटणे हायस्कूल रोडवर जितकर अपार्टमेंटमधून सुमारे ३० फुट उंचीवरून पडल्याने महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला. दरम्यान, या महिलेला दुसऱ्या मजल्यावरून ढकलल्याचा संशय पोलिसांना आहे. अद्याप मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान घटनास्थळी गर्दी झाली, प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. मृत महिला अपार्टमेंटच्या तळमजल्यावररील फुटपाथवर रक्ताच्या थारोळ्यात पडली. मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
या फ्लॅटमध्ये आयुर्वेद दवाखान्याच्या नावाखाली मसाज पार्लर सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक तपास अनुसार संबंधित महिलेचे नाव शोभा कांबळे (वय 37) असे पुढे आले आहे. पोलिसांनी यासंदर्भात दोन महिला व दोन पुरुषांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संबंधित मृत महिलेची सखोलपणे ओळख पटविण्याचे काम शहरापर्यंत सुरू आहे. भर नागरी वस्तीत घडलेल्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी माहिती अशी की राजारामपुरी 11 वि गल्ली बस मार्गावर जितकर अपार्टमेंट आहे. अपार्टमेंट मधील दुसऱ्या मजल्यावरील दोन बेडरूम एक किचन रूमचा फ्लॅट भाड्याने दिला. मंगळवारी दुपारी याच फ्लॅट मधून 30 फूट उंचीवरून एक महिला खाली पडली. रस्त्याकडेला फुटपाथवर ती महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली पडली. परिसरातील नागरिकांनी माहिती राजारामपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन महिलेस सिपीआर रुग्णालयात नेले. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.