महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांना केला घातपाताचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 15:18 IST2022-04-20T15:18:07+5:302022-04-20T15:18:58+5:30
Suspicious Death : डॉ. दिवान यांनीच पत्नीचा घातपात केल्याच्या आरोप नातेवाईकांनी केला आहे.

महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांना केला घातपाताचा आरोप
अमरावती - श्री साई हेल्थ केअरचे संचालक डॉ. पंकज दीवान यांच्या पत्नी डॉ. प्रियंका दीवान (कातकीड़े) (ता.२७) यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना गडगेनगर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या खोडके लाइनमध्ये आज सकाळी ८ वाजता उघडकीस आली.
डॉ. दिवान यांनीच पत्नीचा घातपात केल्याच्या आरोप नातेवाईकांनी केला आहे. सकाळीच गाडगे नगर पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला असून प्रेत शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. पुढील कारवाई गाडगेनगर पोलिस स्टेशन करत आहे.