पत्नीवर संशय घेऊन पतीने २ चिमुकल्या मुलींची केली हत्या अन् व्हिडीओ बनवून पाठवला नातेवाईकांना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 21:59 IST2021-09-27T21:58:16+5:302021-09-27T21:59:06+5:30
Murder Case : 9 वर्षांचा मुलगा आणि 5 वर्षांची मुलगी होती. गेली 10 वर्षे मुरुगन एका ढाब्यावर काम करायचा. त्याचे घर ढाब्याजवळच होते.

पत्नीवर संशय घेऊन पतीने २ चिमुकल्या मुलींची केली हत्या अन् व्हिडीओ बनवून पाठवला नातेवाईकांना
सालेम - तामिळनाडूच्या सालेममधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पतीला संशय आला की त्याची पत्नी विवाहबाह्य संबंधात अडकली आहे, तेव्हा त्याने आपल्या दोन मुलांची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलांना मारल्यानंतर त्याने त्याचा व्हिडिओही बनवला आणि नातेवाईकांना पाठवला. सध्या पोलीस तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 33 वर्षीय मुरुगनचे मुरुगेश्वरीशी लग्न झाले होते. दोघांनाही दोन मुले होती. 9 वर्षांचा मुलगा आणि 5 वर्षांची मुलगी होती. गेली 10 वर्षे मुरुगन एका ढाब्यावर काम करायचा. त्याचे घर ढाब्याजवळच होते.
अशा प्रकारे पत्नीला संशय आला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी काम करत असताना मुरुगन जळाला होता. त्यानंतर तो सुमारे 10 दिवस घरात राहत होता. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्यास सांगितले. या दरम्यान, घरात राहत असताना त्याला संशय आला की त्याच्या पत्नीचे इतर कोणासोबत तरी विवाहबाह्य संबंध आहेत. यानंतर त्याने भयानक पाऊल उचलले.