Sushant Singh Rajput Suicide : चौकशीच्या जाळ्यात रिया, ईडी कार्यालयात पोहचली 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 01:01 PM2020-08-07T13:01:30+5:302020-08-07T13:05:49+5:30

Sushant Singh Rajput Suicide : ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे रियाला ईडी कार्यालयात हजर राहणं बंधनकारक झालं होतं.

Sushant Singh Rajput Suicide: Rhea Chakraborty arrives at ED office in mumbai | Sushant Singh Rajput Suicide : चौकशीच्या जाळ्यात रिया, ईडी कार्यालयात पोहचली 

Sushant Singh Rajput Suicide : चौकशीच्या जाळ्यात रिया, ईडी कार्यालयात पोहचली 

Next
ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये अशी विनंती रियाने केल्याचं तिचेकील सतीश मानशिंदे यांनी सांगितलं. ईडीने सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला नोटीस बजावली होती. त्यानुसार आज रियाची चौकशी होत सुरु आहे.

मुंबई - सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी आणि मणी लॉण्डरिंग प्रकरणी चौकशीसाठी रिया चक्रवर्ती मुंबईतील ईडी (अंमलबजावणी संचालनालय) कार्यालयात दाखल झाली असून तिची चौकशी केली जात आहे. ईडीने सुशांतची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती हिला नोटीस बजावली होती. त्यानुसार आज रियाची चौकशी होत सुरु आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये, अशी विनंती रियानं केली होती. मात्र, ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे रियाला ईडी कार्यालयात हजर राहणं बंधनकारक झालं होतं.

 


सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असेपर्यंत ईडीसमोर जबाब नोंदवण्यात येऊ नये अशी विनंती रियाने केल्याचं तिचेकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितलं. सुशांतच्या खात्यामधून १५ कोटी रुपये काढल्याचा आरोप रियावर करण्यात आला आहे. त्यामुळे याच प्रकरणी रियाची आज चौकशी सुरु आहे. बुधवारी आणि गुरुवारी सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा याची ईडीने चौकशी केली. काल तब्ब्ल ९ तास सॅम्युअलची चौकशी करण्यात आली. दरम्यान, सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये त्यांनी रियाने घर सोडताना घरातील रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप, क्रेडिट कार्ड आणि सुशांतच्या वैद्यकीय सूचनांची कागदपत्रे सोबत नेली असं म्हटलं. तसंच सुशांतच्या खात्यामधील १५ कोटी रुपये देखील रियाने काढले असल्याचा आरोप त्यांनी केला होता. बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे ईडीने रिया विरोधात मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. रियाने करोडो रुपये प्रॉपर्टी खरेदीसाठी वापरल्याचा आरोप केला जात आहे. तसेच रियाचा भाऊ शोविकची देखील ईडी चौकशी करू शकते. 


 

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

...चांगला मेसेज गेला नाही; बिहार पोलीस अधिकाऱ्याला क्वारंटाईन केल्याबद्दल SC ने कान खेचले!

 

Disha Salian Case: नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचं पुराव्यांसाठी आवाहन

 

खळबळजनक! कारागृहात कैद्याने गळफास लावून केली आत्महत्या 

 

सुशांत राजपूत प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहारचे पोलीस परतले; १२ जणांची केली चौकशी

 

डॉक्टर की हैवान! भिवंडीत अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने केला लैंगिक अत्याचार

Web Title: Sushant Singh Rajput Suicide: Rhea Chakraborty arrives at ED office in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.