शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 2:33 PM

आता वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना समन्स पाठविले आहे.

ठळक मुद्दे सुशांत सिंग राजपूत (३४) याच्या आत्महत्येप्रकरणी अनेक बड्या हस्तीची चौकशी पोलीस करत आहेत. रामलीला चित्रपटातून सुशांतला काढण्यासाठी चित्रपट निर्मात्यावर कोणी दबाव टाकला होता का याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत.

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात वांद्रे पोलीस अतिशय बारकाईने तपास करत आहेत. सुशांतच्या आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी बर्‍याच जणांची चौकशी केली जात आहे. आता वांद्रे पोलिसांनी या प्रकरणात चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना समन्स पाठविले आहे. भन्साळी यांना पोलिसांनी सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे.सुशांत सिंग राजपूत (३४) याच्या आत्महत्येप्रकरणी अनेक बड्या हस्तीची चौकशी पोलीस करत आहेत. त्यांच्या दबावातून संजय लीला भन्साळीच्या 'गोलियों की रासलीला राम-लीला' या चित्रपटातून सुशांतला रिप्लेस करत त्याजागी रणवीर सिंगला लीड रोल देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानुसार याप्रकरणी चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांच्याकडे पोलीस चौकशी करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.रामलीला चित्रपटातून सुशांतला काढण्यासाठी चित्रपट निर्मात्यावर कोणी दबाव टाकला होता का याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. रामलीला आणि बाजीराव मस्तानी हे चित्रपट सुशांतला मिळणार होते. मात्र, त्याआधी सुशांतचे यशराज फिल्म्ससोबत करार झाल्याने त्याला त्या चित्रपटात काम करता आले नाही. परिणामी त्याच्यातील नात्यात कटुता आली होती. त्यामुळे यातील तथ्य जाणुन घेण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत आहेत. त्यानुसार अद्याप ३० जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले असून याप्रकरणी अनेकांना समन्स पाठविण्यात आले आहेत. ज्यात भन्साळी यांचाही समावेश असल्याचे समजते. मात्र, याबाबत पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे किंवा वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निखिल कापसे यांच्याकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.भन्साळी यांनी सुशांत ३ चित्रपटांची ऑफर दिली होतीअभिनेता संजय लीला भन्साळी यांनी त्याच्या तीन चित्रपटांसाठी या अभिनेत्याकडे संपर्क साधला असल्याचे चित्रपटाचे समीक्षक सुभाष के झा यांनी सुशांतबद्दल उघड केले. ज्यामध्ये बाजीराव मस्तानी, गोलियां की रसलीला राम-लीला आणि पद्मावत यांचा समावेश होता. सुभाष झा यांनी सांगितले होते की, जेव्हा सुशांत सिंग पानी या चित्रपटाची तयारी करत होता तेव्हा ती फिल्म बनवली नाही. तर सुशांतला बाजीराव मस्तानीची ऑफर देण्यात आली. संजय लीला भन्साळी यांनी मला सांगितले होते. '' पण सुशांतला हा चित्रपट करता आला नाही. त्यानंतर संजय लीला भन्साळीने त्यांना गोलियों की रासलीला राम-लीला आणि नंतर पद्मावतमध्ये भूमिकेची ऑफर दिली. आजच्या काळात संजय लीला भन्साळी हे सर्वात प्रसिद्ध  दिग्दर्शक आहे आणि सुशांत त्याचे तीन चित्रपट स्वीकारू शकला नाही. 

संजय लीला भन्साळी यांच्याव्यतिरिक्त एंटरटेनमेंट न्यूज पोर्टलचे संपादक असलेले पत्रकार विक्की लालवाणी यांनाही वांद्रे पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात विक्की लालवाणी यांचीही चौकशी केली गेली.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

आधी गळा आवळला, मग पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं डोक, चिमुकल्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

 

नियमांचे उल्लंघन: २०२ दुचाकींसह २४५ वाहने वाहतूक शाखेने केली जप्त

 

पत्नीच्या हत्येप्रकरणी जामिनावर; आमदार अमनमणि त्रिपाठींनी केले दुसरे लग्न

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साळीPoliceपोलिस