शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

Sushant Singh Rajput death case : सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी निर्माता-दिग्दर्शक करण जोहरची चौकशी होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 8:56 AM

मीडिया रिपोर्ट्स आणि पोलिसांच्या चौकशीत काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामध्ये सुशांत आणि धर्मा प्रॉडक्शन यांच्यात 'ड्राईव्ह' चित्रपटावरुन वाद निर्माण झाला होता.

ठळक मुद्देयाप्रकरणी आज धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांची चौकशी होणार आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी काल निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यानंतर आता मुंबई पोलीस निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याची चौकशी करणार आहेत. या आठवड्यात करण जोहरचा जबाब नोंदवला जाणार आहे. तसेच, याप्रकरणी आज धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांची चौकशी होणार आहे. 

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या ट्विटनुसार, मुंबई पोलीस या आठवड्याच्या अखेरीस करण जोहर याची चौकशी करू शकतात. त्याचबरोबर, धर्म प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांची आज चौकशी केली जाणार आहे. तसेच, मुंबई पोलिसांनी धर्मा प्रॉडक्शन आणि सुशांत यांच्यातील 'ड्राईव्ह' चित्रपटासंदर्भातील कराराची प्रतही मागितली आहे.

मीडिया रिपोर्ट्स आणि पोलिसांच्या चौकशीत काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामध्ये सुशांत आणि धर्मा प्रॉडक्शन यांच्यात 'ड्राईव्ह' चित्रपटावरुन वाद निर्माण झाला होता. तसेच, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदीने पोलीस चौकशीत करण जोहर आणि सुशांत यांच्यातील तणावाचा उल्लेख केला आहे. तसेच, 'ड्राईव्ह' चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याच्या निर्णयावरून  सुशांत नाराज होता. त्यामुळे या चित्रपटावरून सुशांत आणि करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये काही मतभेद होते का, याची चौकशी मुंबई पोलीस करत आहेत.

दरम्यान, सोमवारी (२७ जुलै) सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. महेश भट्ट हे काल  सकाळी ११ च्या सुमारास पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर जवळपास दोन तास त्यांची चौकशी पोलिसांनी केली. 

आणखी बातम्या...

राफेलच्या स्वागतासाठी अंबाला हवाईतळावर जय्यत तयारी, ३ किमीचा परिसर ड्रोन झोन घोषित

"हा दिवस म्हणजे, भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची संधी", वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदींचे उद्धव ठाकरेंना पत्र

'लालू-कवच' असताना सुशीलकुमार मोदींनी कोरोनाला घाबरू नये - राबडी देवी    

पब्जीसह २७५ चिनी अ‍ॅप्सवर बंदी? सरकार चीनला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत    

'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!    

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSushant Singhसुशांत सिंगKaran Joharकरण जोहरMahesh Bhatमहेश भटMumbai policeमुंबई पोलीसbollywoodबॉलिवूड