सुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 16:38 IST2020-08-14T16:36:45+5:302020-08-14T16:38:30+5:30
Sushant Singh Rajput Suicide : त्याने आपल्या स्टोरीमध्ये लिहिलेले सुशांतच्या कुटुंबाला सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा हक्क आहे. मात्र, यासाठी त्यांनी मोठी लढाई लढावी लागणार आहे.

सुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को...
नवीन दिल्ली - सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी सतत सोशल मीडियावर सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. आज सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला 2 महिने पूर्ण झाले आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणात अद्याप काही ठोस निष्पन्न झालेलं नाही. तसेच, सुशांतच्या कुटुंबातील लोकांपैकी राजकीय नेत्यांकडून देखील सुशांतच्या मृत्यूची सीबीआय तपासणीची मागणी केली जात आहे. दरम्यान, बॉलीवुड अभिनेता सूरज पांचोलीने इंस्टाग्राम स्टोरी शेयर करत सुशांतच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्याने आपल्या स्टोरीमध्ये लिहिलेले सुशांतच्या कुटुंबाला सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा हक्क आहे. मात्र, यासाठी त्यांनी मोठी लढाई लढावी लागणार आहे.
सूरज पांचोलीने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय तपासणीची मागणी करत "मी खरंच अशी प्रार्थना करतो आणि आशा बाळगतो की सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबियांना जे त्यांना हवं ते मिळो, सुशांतचे कुटुंबीयांचा सीबीआय तपासणीची मागणी करण्यास हक्क आहे. पहिल्यापासून यासाठी त्यांना मोठी लढाई लढावी लागली आहे. त्यांना हे जाणून घेणं आवश्यक आहे की, शेवटी नेमकं काय झालं होतं आणि जगालाही हे माहित झालं पाहिजे." असे लिहिले आहे. सूरजशिवाय परिणीती चोपडा, अंकिता लोखंडे, कृति सेनन आणि कंगना रानौत यासारख्या कलाकारांनी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय तपासणीची मागणी केली आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्या मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत मुंबई पोलिसांनी ५६ जणांचा जबाब नोंदवला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी
Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी
सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत