भाजपाच्या नेत्याच्या हत्येनंतर समर्थकांनी जाळली पोलीस चौकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 20:06 IST2019-10-09T20:03:18+5:302019-10-09T20:06:37+5:30
रोडवस पोलीस चौकीची तोडफोड करून आग लावण्यात आली.

भाजपाच्या नेत्याच्या हत्येनंतर समर्थकांनी जाळली पोलीस चौकी
बस्ती - उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात भाजपा नेता आणि माजी छात्रसंघाचे अध्यक्ष कबीर तिवारी यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना जेरबंद केले आहे. मात्र, कबीर यांच्या हत्येचा त्यांच्या समर्थकांनी निषेध नोंदविला आहे. या निषेधाने उग्र रूप धारण करत संपूर्ण शहरात काही ठिकाणी तोडफोड करण्यात आली. दरम्यान रोडवेज बसेसची तोडफोड करण्यात आली. एवढेच नाही तर रोडवस पोलीस चौकीची तोडफोड करून आग लावण्यात आली.
या धक्कादायक प्रकारानंतर मोठ्या प्रमाणावर पोलिसांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या. तिवारी यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर जखमी झालेल्या तिवारी यांना ट्रॉमा सेंटरमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. दरम्यान लखनऊ येथून ट्रॉमा सेंटरला पोहचेपर्यंत तिवारी यांनी शेवटचा श्वास घेतला.