खळबळजनक! हत्या प्रकरणातील कैद्याची कारागृहात गळफास लावून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 18:05 IST2021-07-21T18:04:49+5:302021-07-21T18:05:34+5:30

Suicide Case : घाम पुसण्याच्या पांढऱ्या दुपट्ट्याने गळफास लावल्याचेही सांगितले.

Suicide by hanging of a prisoner in a murder case | खळबळजनक! हत्या प्रकरणातील कैद्याची कारागृहात गळफास लावून आत्महत्या

खळबळजनक! हत्या प्रकरणातील कैद्याची कारागृहात गळफास लावून आत्महत्या

ठळक मुद्देउमेश दामाजी नैताम (२५) या कैद्याने बुधवारी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर:जिल्हा मध्यवर्ती कारागृहात हत्या प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या उमेश दामाजी नैताम (२५) या कैद्याने बुधवारी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील साखरटोला या गावचा रहिवासी असलेला उमेश नैताम हा हत्या प्रकरणात येथे शिक्षा भोगत होता. बुधवारी दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास बॅरेक क्रमांक सहाच्या स्वच्छतागृहाचे मागे कैद्याने गळफास लावून घेतल्याचे सुरक्षेत तैनात शिपायाला दिसले. लागलीच त्याला खाली उतरवून वैद्यकीय अधिकाºयाला पाचारण करण्यात आले. वैद्यकीय अधिकाºयांनी तपासनीनंतर कैद्याचा मृत्यू झाल्याचे सांगितल्याची माहिती तुरूंग अधिकारी आत्राम यांनी दिली. घाम पुसण्याच्या पांढऱ्या दुपट्ट्याने गळफास लावल्याचेही सांगितले.

Web Title: Suicide by hanging of a prisoner in a murder case