Suicide, accident! The body of the officer was found near the railway tracks while the police investigation was underway | आत्महत्या, दुर्घटना की घातपात! पोलिस चौकशी सुरु असताना अधिकाऱ्याचा रेल्वे रुळाजवळ आढळून आला मृतदेह

आत्महत्या, दुर्घटना की घातपात! पोलिस चौकशी सुरु असताना अधिकाऱ्याचा रेल्वे रुळाजवळ आढळून आला मृतदेह

ठळक मुद्दे त्यांचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळून आल्याने आत्महत्या, दुर्घटना की घातपात आहे या तिहेरी अंगाने कल्याण रेल्वे पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

कल्याण - आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु असलेल्या एका मोठया कंपनीतील अधिका:याचा मृतदेह टिटवाळा रुळाजवळ मृतदेह आढळून आला आहे. त्याचे नाव  सागर सुहास देशपांडे असून ते ठाण्याला राहत होते. ११ ऑक्टोबरपासून ते बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळून आल्याने आत्महत्या, दुर्घटना की घातपात आहे या तिहेरी अंगाने कल्याण रेल्वेपोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.


टिटवाळा रेल्वे रूळानजीक एका व्यक्तिचा मृतदेह १२ ऑक्टोबर रोजी मिळून आला होता. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी आकस्मीत मृत्यूची नोंद केली होती. या प्रकरणाचा तपास सुरु केला होता. या मृतदेहाची ओळख पटण्यासाठी त्यांनी मृतदेहाचे फोटो सगळीकडे पाठविले होते. अखेर पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली. ही व्यक्ति ठाण्याला राहत असून तिचे नाव सागर सुहास देशपांडे असे आहे. सागर हे एका मोठय़ा कंपनीत अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु होती. ११ ऑक्टोबर रोजी ते टिटवाळ्य़ाला जात असल्याचे त्यांनी त्यांच्या घरी सांगितले. ते तेव्हापासून घराबाहेर पडले. ते पुन्हा घरी परतले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी ते बेपत्ता झाले असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदविली होती. सहा दिवसांपासून त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते.


कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरूल यांनी दिलेल्या माहितीनुसार १२ आक्टोबर रेल्वे रूळाजवळ एक मृतदेह आढळून आला. माहिती काढून शोध घेतला असता  तो मृतदेह सागर देशपांडे यांचा आहे हे स्पष्ट झाले. त्यांचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळून आला. त्या ठिकापासून जवळपास दीड किलोमीटर अंतराव त्यांची चार चाकी गाडी निजर्नस्थळी आढळून आली.

Web Title: Suicide, accident! The body of the officer was found near the railway tracks while the police investigation was underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.