पबमध्ये भेटलेल्या विद्यार्थ्यांनी कारमध्ये अल्पवयीन मुलीवर केला गँगरेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 16:11 IST2022-06-03T14:34:04+5:302022-06-03T16:11:42+5:30
Gangrape Case : एका आमदाराचा मुलगा या दुष्कृत्यामध्ये सहभागी असल्याचे मानले जाते, परंतु पोलिसांचे म्हणणे आहे की, तो सामूहिक बलात्कारात सहभागी नसावा.

पबमध्ये भेटलेल्या विद्यार्थ्यांनी कारमध्ये अल्पवयीन मुलीवर केला गँगरेप
हैदराबाद : पार्टीसाठी पबमध्ये गेलेल्या हैदराबादमधील तरुणीवर गेल्या शनिवारी मर्सिडीज कारमध्ये शाळकरी मुलांनी सामूहिक बलात्कार केला. विधी संघर्ष बालक हे इयत्ता 11 आणि 12 चे विद्यार्थी आहेत आणि कथितरित्या "राजकीयदृष्ट्या प्रभावशाली" कुटुंबातील आहेत. एका आमदाराचा मुलगा या दुष्कृत्यामध्ये सहभागी असल्याचे मानले जाते, परंतु पोलिसांचे म्हणणे आहे की, तो सामूहिक बलात्कारात सहभागी नसावा.
शनिवारी संध्याकाळी 17 वर्षीय तरुणी मित्रासोबत पबमध्ये गेली होती, ती लवकर निघून गेली. अल्पवयीन मुलीने एका मुलाशी मैत्री केली आणि तो आणि त्याच्या मित्रांसह क्लब सोडला. त्यांनी तिला घरी सोडण्याचे आश्वासन दिले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गँगरेपपूर्वीविद्यार्थ्यांच्या घोळका पेस्ट्रीच्या दुकानात गेला होता.
शहरातील ज्युबली हिल्स परिसरात पाच मुलांनी कार पार्क केली आणि मुलीवर बलात्कार केला तर इतर कारच्या बाहेर पहारा देत होते. या प्रकरणात ज्या आमदाराच्या मुलाचे नाव समोर आले आहे. तो गँगरेप करून गाडीतून उतरला आणि पळून गेला. जेव्हा मुलीच्या वडिलांनी तिच्या मानेवर जखमा पाहिल्या आणि तिला त्याबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले की, पबमध्ये एका पार्टीनंतर काही मुलांनी तिच्यावर बलात्कार केला होता.