लोकल ट्रेनमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 21:27 IST2018-08-31T21:25:43+5:302018-08-31T21:27:09+5:30
अंकित मिश्रा असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. नालासोपारा पुर्वेच्या तुळींज येथील पाचअंबा परिसरात राहणारा अंकित मिश्रा (वय - १९) हा तरूण विरारच्या विवा महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकत होता.

लोकल ट्रेनमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
वसई - लोकल ट्रेन मधून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. आज विरारमधील नारिंगी फाटकाजवळ ही दुर्घटना घडली. अंकित मिश्रा असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. नालासोपारा पुर्वेच्या तुळींज येथील पाचअंबा परिसरात राहणारा अंकित मिश्रा (वय - १९) हा तरूण विरारच्या विवा महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिकत होता. शुक्रवारी महाविद्यालय सुटल्यानंतर तो सफाळे येथे मित्रांसमवेत फिरण्यासाठी गेला होता. दुपारी बारा वाजता सफाळे रेल्वे स्थानकातून लोकल ट्रेन पकडून तो घरी परतत होता. विरार येथील नारिंगी फाटकाजवळून ट्रेन जात अंकीतचा तोल गेला आणि खाली पडून मृत्यू झाला. दारात उभा असल्याने तोल जाऊन पडल्याचे प्रवाशांनी सांगितले. या तरुणाचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याची माहिती वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी दिली. मात्र,तो नेमका कसा पडला ते तपासानंतर स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले. वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकऱणी अपघाती मृत्यूची नोंद कऱण्यात आली आहे.