उंदीर मारण्याच्या गोळ्या खाल्ल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 19:32 IST2019-09-01T19:27:52+5:302019-09-01T19:32:00+5:30

त्याने गोळ्या का खाल्ल्या याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

Student has died after having rat killing pills | उंदीर मारण्याच्या गोळ्या खाल्ल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू 

उंदीर मारण्याच्या गोळ्या खाल्ल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू 

ठळक मुद्देउलट्यांचा त्रास होवू लागल्याने नातेवाईकांनी त्याला चोपडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार केल्यानंतर रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

जळगाव - उंदीर मारण्याच्या गोळ्या खाल्ल्याने सुरेंद्र धनराज खैरनार (२०, रा.नांदेड, ता.धरणगाव) या तरुणाचा रविवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. सुरेंद्र याने शनिवारी दुपारी उंदीर मारण्याच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. उलट्यांचा त्रास होवू लागल्याने नातेवाईकांनी त्याला चोपडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार केल्यानंतर रविवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. सुरेंद्र हा बारावीत होता. धरणगाव महाविद्यालयात तो शिक्षण घेत होता. त्याने गोळ्या का खाल्ल्या याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

Web Title: Student has died after having rat killing pills