लघुशंकेसाठी थांबला अन् ११ हजार रुपये किंमतीची १८ पार्सल असलेली बॅग गमावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 16:16 IST2021-02-09T16:16:06+5:302021-02-09T16:16:26+5:30
Robbery : या प्रकरणी चिचंवड पोलीस ठाण्यात मोटारसायकलवरुन आलेल्या दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लघुशंकेसाठी थांबला अन् ११ हजार रुपये किंमतीची १८ पार्सल असलेली बॅग गमावली
ठळक मुद्दे भीमचंद अंकुश भालेराव (वय ३२, रा. आंबेडकर वसाहत, उर्मिला सोसायटी, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे.
पिंपरी : लघुशंकेसाठी थांबला असता ११ हजार रुपये किंमतीची १८ पार्सल असलेली बॅग चोरट्याने पळविली. या प्रकरणी चिचंवड पोलीस ठाण्यात मोटारसायकलवरुन आलेल्या दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Video : दूध व्यावसायिकाकडून २ कोटींची खंडणी मागणाऱ्या गँगस्टर एजाज लकडावालाला अटक
भीमचंद अंकुश भालेराव (वय ३२, रा. आंबेडकर वसाहत, उर्मिला सोसायटी, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सोमवारी (दि. ८) दुपारी पावणेतीनच्या सुमारास चिंचवडमधील बिजलीनगर येथे लघुशंकेसाठी थांबले होते. मोटारसायकलवर ११ हजार ८२ रुपये किंमतीची १८ पार्सल असलेली बॅग ठेवली होती. चोरट्यांनी ही बॅग पळवून नेली.