Psycho Killer Poonam: "जसं मुलांना तडफडून मारलं, तशीच भयंकर शिक्षा द्या"; सायको किलर पूनमच्या पतीचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 14:41 IST2025-12-06T14:39:57+5:302025-12-06T14:41:29+5:30
Psycho Killer Poonam: पूनमचा पती नवीनने यावर आता प्रतिक्रिया दिली आहे.

Psycho Killer Poonam: "जसं मुलांना तडफडून मारलं, तशीच भयंकर शिक्षा द्या"; सायको किलर पूनमच्या पतीचं मोठं विधान
हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील नौलथा गावातील पूनमने चार मुलांची हत्या केली आहे. पोलिसांना हत्या प्रकरणाचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पूनमने स्वत:च्या मुलालाही सोडलं नाही. तिने आपल्या मुलाचा देखील जीव घेतला. विधी, शुभम, इशिका आणि जिया या चार लहान मुलांची तिने हत्या केली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडली आहे.
पूनमचा पती नवीनने यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. "पूनमने जसं लहान मुलांना पाण्यात बुडवून, तडफडून-तडफडून मारलं, तशीच तिला भयंकर शिक्षा द्या" असं नवीनने म्हटलं आहे. तसेच तो कधीही कोणत्याही मांत्रिकाकडे पत्नीसोबत गेला नसल्याचं देखील सांगितलं. तो त्याच्या मुलाचा आणि भाचीचा मृत्यू हा केवळ एक अपघात मानत होता. विधीच्या मृत्यूनंतरपोलिसात तक्रार दाखल केली तेव्हा सत्य बाहेर आलं.
काहींना टबमध्ये बुडवलं तर काहींना...; 'सायको काकी'ची थरकाप उडवणारी मोडस ऑपरेंडी
नवीनने सांगितलं की २०१९ मध्ये त्याचं पूनमशी लग्न झालं होतं आणि लग्नानंतर कधीच असं वाटलं नाही की, ती मानसिकदृष्ट्या आजारी आहे, परंतु ती वारंवार नाराज होऊन माहेरी जायची. ती कधी असं काही करेल असं वाटलं देखील नव्हतं, ती सासू-सासऱ्याशी छोट्या गोष्टींवरून नेहमीच वाद घालायची. पूनमच्या या विकृत वागण्याचा सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?
चार निष्पाप मुलांच्या हत्येच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली आहे. पूनमच्या जाऊबाईंनी दिलेल्या माहितीनुसार, "२०२३ पूर्वी ती खूप शांत होती. पण हळूहळू ती बदलू लागली. अनेकदा ती घरी अचानक गप्प बसायची आणि काही मिनिटांनी तिचा चेहरा पूर्णपणे वेगळा दिसायचा. तिला काही विचारलं तर ती म्हणायची मी सर्वांचा नाश करेन, पण आवाज तिचा वाटत नसे. आम्ही घाबरायचो. पण काही मिनिटांनी ती पुन्हा सामान्य दिसायची."