गिरीश महाजन को बोल दे, नही तो बहोत बड़ा ब्लास्ट हो जाएगा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2020 01:56 PM2020-10-14T13:56:39+5:302020-10-14T13:58:20+5:30

Threatening : खंडणीची मागणी : फडणवीसांच्या कार्यक्रमस्थळी बॉम्ब ठेवल्याचा फोन

Speak to Girish Mahajan, otherwise there will be a big blast | गिरीश महाजन को बोल दे, नही तो बहोत बड़ा ब्लास्ट हो जाएगा

गिरीश महाजन को बोल दे, नही तो बहोत बड़ा ब्लास्ट हो जाएगा

googlenewsNext
ठळक मुद्देएक कोटीची खंडणीची धमकी देणारा संदेश आल्याने खळबळ उडाली. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

जामनेर : जामनेर येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम होणार आहे, त्या ठिकाणी बॉम्ब ठेवले असल्याचा फोन मोबाईलवरून गिरीश महाजनांचे स्वीय सहाय्यक दिपाय तायडे यांना दुपारी आला. आणि नंतर एक कोटीची खंडणीची धमकी देणारा संदेश आल्याने खळबळ उडाली. याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी जामनेर येथे ग्लोबल हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. ज्या इमारतीत कार्यक्रम होणार होता. त्या ठिकाणी बॉम्ब ठेवले आहेत, असा मोबाईल कॉल गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांना दुपारी दोन वाजता आला. यानंतर ३ वाजून ३७ मिनिटांनी त्यांच्याच मोबाईलवर ५ वाजेपर्यंत १ कोटी पाठवण्याची धमकी देणारा टेक्स्ट मॅसेज आला. दरम्यान, मोबाईलवर फोन येत असताना तायडे यांनी याठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या सपोनि सुंदरडे यांना स्पिकर ऑन करून ऐकविले. दरम्यान, या प्रकारची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाईची मागणी भापजचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी केली आहे.



*फोन करताना हिंदीत बोलत होता. आपने जहाँ कार्यक्रम रखा है, उसके चारो तरफ बॉम्ब राखे है, ये बात में आपको बता रहा हू. आपको क्या करना है देखो. 

*यानंतर आलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, ५ बजे तक १ करोड भेज दे महाजनको बोल दे नाही तो बहोत बडा ब्लास्ट हो जाएगा, मालेगांव मे मेरे आदमी खडे है, नाही तो तुम्हारी मर्जी मेरा काम कारके निकाल जाऊंगा. 

*तायडे यांचे फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम ३८४, ३८५, ५०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे तपास करीत आहे. 

Web Title: Speak to Girish Mahajan, otherwise there will be a big blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.