खेदजनक! २ वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार; अल्पवयीन आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 21:42 IST2018-11-10T21:42:27+5:302018-11-10T21:42:42+5:30
आईने अल्पवयीन दोन आरोपींविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पॉक्सोच्या गुन्ह्यांतर्गत अल्पवयीन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं.

खेदजनक! २ वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार; अल्पवयीन आरोपींना अटक
पालघर - पालघर जिल्ह्यातील खानपाडा परिसरातील २ वर्षाच्या चिमुकलीवर दोन अल्पवयीन भामट्यांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी पालघर पोलिसांनी एका १० वर्षाच्या आणि १२ वर्षाच्या आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. या दोघांना न्यायालयाने बालसुधार गृहात पाठविले आहे.
२ वर्षाची चिमुरडी नेहमीप्रमाणे घराबाहेर खेळत होती. त्यावेळी अल्पवयीन दोन आरोपींची तिच्यावर नजर गेली. त्यानंतर त्यांनी चिमुरडीला स्वयंपाकगृहात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. चिमुरडीच्या पोटात दुखू लागल्याने ती रडू लागली. आईने खोदून खोदून विचारल्यानंतर तिने वरवर माहिती दिली. नंतर आईने अल्पवयीन दोन आरोपींविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पॉक्सोच्या गुन्ह्यांतर्गत अल्पवयीन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं.