औषधांची खरेदी करुन बाहेर पडताच तरुणाला भरधाव मोटारीने उडविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 17:56 IST2019-09-20T17:54:30+5:302019-09-20T17:56:36+5:30
औषधं घेवून दुकानाबाहेर येताच धनकवडी गावठाणाकडून वेगाने येणाऱ्या मोटारीने अमित यांना जोरदार धडक दिली..

औषधांची खरेदी करुन बाहेर पडताच तरुणाला भरधाव मोटारीने उडविले
पुणे : औषधं घेत मेडिकल स्टोर्समधून बाहेर पडताच वेगाने येणाऱ्या मोटारीने जोरदार धडक देवून एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुलाबनगर येथे रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. अमित श्रीपाद वैद्य (वय ३७ ,रा. रक्षलेखा सोसायटी,धनकवडी) मृत्यू झाल्याचे नाव असून मोटार चालक न थांबता पुन्हा वेगाने जाताना तीन हत्ती चौकात लक्ष्मी कदम या महिलेला धडकून गंभीर जखमी केले आहे. सहकारनगर पोलिस तपास करीत आहेत.
अमित वैद्य व त्यांच्या पत्नी रात्री साडे दहा वाजता दवाखान्यात जावून औषधं घेण्यासाठी गुलाबनगर येथील मेडिकल स्टोअर्स मध्ये गेले होते. औषधं घेवून दुकानाबाहेर येताच धनकवडी गावठाणाकडून वेगाने येणाऱ्या मोटारीने अमित यांना जोरदार धडक दिली. मोठा आवाज झाल्यानंतर त्या दिशेने अनिल भोसले, गौरव शिळीमकर, मोहन आहिरेकर धावले. त्यांनी तत्काळ अमीत यांना रिक्षातून रूग्णालयात दाखल केले. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे अमित यांचा मृत्यू झाला. मोटार चालक न थांबता वेगाने पसार झाला. तीन हत्ती चौकात त्याने लक्ष्मी कदम या महिलेलाही जोरदार धडक दियाचे पुढे आले आहे.