धक्कादायक! जावयानं सासऱ्यासह पत्नी आणि मुलाला पेट्रोल ओतून जाळलं, सासऱ्याचा मृत्यू

By नरेश रहिले | Published: February 15, 2023 10:59 AM2023-02-15T10:59:36+5:302023-02-15T11:02:41+5:30

याप्रकरणात रामनगर पोलिसांनी तपास सुरु केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेने संपूर्ण सुर्याटोला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Son-in-law along with father-in-law burnt wife and child by pouring petrol, death of father-in-law | धक्कादायक! जावयानं सासऱ्यासह पत्नी आणि मुलाला पेट्रोल ओतून जाळलं, सासऱ्याचा मृत्यू

धक्कादायक! जावयानं सासऱ्यासह पत्नी आणि मुलाला पेट्रोल ओतून जाळलं, सासऱ्याचा मृत्यू

googlenewsNext

गोंदिया – गोंदिया शहरानजीक असलेल्या रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या सुर्याटोला येथे जावयाने सासऱ्यासह पत्नी व मुलाला पेट्रोल ओतून जाळल्याची धक्कादायक घटना रात्री 1 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत आरोपीचा सासर देवानंद मेश्राम (वय 52 रा.सुर्याटोला) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर आरोपीची पत्नी आरती किशोर शेंडे(वय 35,रा.भिवापूर,ता.तिरोडा) व मुलगा जय किशोर शेंडे(वय 5 रा.भिवापूर,ता.तिरोडा) हे 90 टक्के जळाल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात उपचाराकरीता हलविण्यात आले आहे.

आरोपी जावई किशोर श्रीराम शेंडे(वय 40 रा. भिवापूर, ता. तिरोडा) हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी किशोर शेंडे यांच्यासोबत दररोज भांडण होत असल्याने व मारहाण होत असल्याने, पत्नी आरती सासर सोडून गेल्या वर्षभरापासून माहेरी सुर्याटोला येथे राहत होती. या दरम्यान पोटापाण्याची सोय व्हावी याकरीता येथील सहयोग रुग्णालयात ती नोकरी करीत होती. घटनेच्या दिवशी जेवण करुन आरोपीचे सासरे देवानंद मेश्राम हे बाहेर व पत्नी व मुलगा आत झोपले असताना, जावयाने आधी सासऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून आग लावली. यानंतर आत झोपलेल्या पत्नी व मुलाच्या अंगावरही पेट्रोल ओतून आग लावली आणि पसार झाल्याचे वृत्त आहे. याप्रकरणात रामनगर पोलिसांनी तपास सुरु केला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेने संपूर्ण सुर्याटोला परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Son-in-law along with father-in-law burnt wife and child by pouring petrol, death of father-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.