Son blackmail mother with obscene picture property dispute in kota rajasthan pda | बापरे! आईचे अश्लील फोटो काढून केले ब्लॅकमेल, पोटच्या मुलानेच रचला निर्दयी कट

बापरे! आईचे अश्लील फोटो काढून केले ब्लॅकमेल, पोटच्या मुलानेच रचला निर्दयी कट

ठळक मुद्दे राजस्थानच्या कोटा येथील शिवपुरा भागातील एका महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली75 वर्षीय महिलेने सांगितले की, मालमत्तेच्या वादामुळे तिच्या मुलाने तिचे अश्लील फोटो काढले आणि ते आपल्याच कुटुंबातील लोकांच्या फोनवर पाठवू लागला.

पोटच्या मुलाने स्वत: च्या आईविरूद्ध मालमत्ता हस्तगत करण्यासाठी हा लज्जास्पद कट रचला आहे. त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल. असा आरोप केला जात आहे की, त्याच्या नावावर संपत्ती मिळवण्यासाठी एका मुलाने मोबाईलवरून त्याच्या आईचे अश्लील फोटो काढले आणि नंतर तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

राजस्थानच्या कोटा येथील शिवपुरा भागातील एका महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि सांगितले की, आपला मुलगा मालमत्तेसाठी ब्लॅकमेल करीत आहे. 75 वर्षीय महिलेने सांगितले की, मालमत्तेच्या वादामुळे तिच्या मुलाने तिचे अश्लील फोटो काढले आणि ते आपल्याच कुटुंबातील लोकांच्या फोनवर पाठवू लागला.

या महिलेने सांगितले की, जेव्हा एका दिवशी ती पूजेदरम्यान घरात हवन करीत होती, तेव्हा मुलाने आरडाओरड सुरू केली आणि आगीतून सुटण्यासाठी कपडे काढायला सांगितले आणि आरोपी मुलाने कपडे काढताच फोटो काढले.

या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस अधिकारी ताराचंद यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवपुरा येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिलेने 2 दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली होती. आपल्या तक्रारीत महिलेने आरोप केला आहे की, मालमत्तेच्या वादामुळे तिचा 50 वर्षीय मुलाने नग्न फोटो काढला होता आणि कुटुंबाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविला होता. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली. पण त्याने तो फोटो मोबाईलवरून डिलीट केला. तांत्रिक तज्ञांच्या मदतीने पोलिसांनी तो फोटो परत मिळवला. त्या फोटोच्या आधारे कोर्टाने आरोपी मुलाला तुरूंगात पाठविले.

 

मोठं यश! जम्मू - काश्मीरमध्ये गोळीबारात हिजबुल मुजाहिद्दीनच्या टॉप कमांडरला केले ठार 

 

मनरेगाच्या कामातून दुहेरी हत्येने खळबळ; 'समाजवादी पक्षाच्या नेत्याचा आणि मुलाचा खून

 

Coronavirus Lockdown : डिप्रेशनचे औषध विक्रीच्या बहाण्याने पठ्ठ्याने विकल्या नशेच्या गोळ्या

Web Title: Son blackmail mother with obscene picture property dispute in kota rajasthan pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.