दुचाकी अपघातात सैनिकाचा मृत्यू, दोन तरुण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 17:01 IST2022-04-15T17:01:27+5:302022-04-15T17:01:50+5:30
Accident : गौतम योगीराज तायडे (वय २६ वर्षे), प्रशिक रामराव तायडे (वय २४ वर्षे) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुचाकी अपघातात सैनिकाचा मृत्यू, दोन तरुण गंभीर जखमी
पळशी बु. (बुलडाणा) : संभापूर येथे दुचाकी अपघातातसैनिकाचामृत्यू झाला असून, दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. त्यांच्यावर अकोला येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हिंगणा (उमरा) येथील मूळ रहिवासी सेवानिवृत्त सैनिक शामराव हरिचंद्र तायडे मागील काही वर्षांपासून आदर्शनगर शेगाव येथे स्थायीक झाले आहेत. त्यांचा मुलगा पंकज (वय २८ वर्षे) ६ वर्षापूर्वी सैन्यदलात दाखल झाला. तो मागील महिण्यात शेगाव येथे सुट्टीवर आला होता. हिंगणा (उमरा) या मूळ गावी भीमजयंती साजरी करण्याकरिता १४ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान जात असताना एम एच १२.के एम ५१६७ क्रमाकाच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातामध्ये पंकज शामराव तायडे यांचा मृत्यू झाला. गौतम योगीराज तायडे (वय २६ वर्षे), प्रशिक रामराव तायडे (वय २४ वर्षे) हे दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर अकोला येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.