सापांच्या रेस्क्यूच्या आडून पुण्यात गांजाची तस्करी; ५६ लाख सबस्क्रायबर्स असलेल्या सर्पमित्राला बेड्या; कोटींचा गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 15:30 IST2026-01-31T15:13:05+5:302026-01-31T15:30:28+5:30

रुग्णवाहिकेतून कोट्यवधींच्या गांजाची वाहतूक करणाऱ्या सर्पमित्राला पोलिसांनी अटक केली आहे.

social media star akash jadhav turned out to be the mastermind of cannabis smugglers snake rescuer with 56 lakh subscribers has been arrested | सापांच्या रेस्क्यूच्या आडून पुण्यात गांजाची तस्करी; ५६ लाख सबस्क्रायबर्स असलेल्या सर्पमित्राला बेड्या; कोटींचा गांजा जप्त

सापांच्या रेस्क्यूच्या आडून पुण्यात गांजाची तस्करी; ५६ लाख सबस्क्रायबर्स असलेल्या सर्पमित्राला बेड्या; कोटींचा गांजा जप्त

Youtuber Akash Jadhav: सोशल मीडियावर सर्पमित्र आणि समाजसेवक म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका नामवंत युट्यूबरचा खरा चेहरा आता समोर आला आहे. सापांना जीवनदान देण्याच्या बहाण्याने कोट्यवधींच्या गांजाची तस्करी करणाऱ्या आकाश जाधव याला छत्तीसगडच्या महासमुंद पोलिसांनी अटक केली आहे. आकाश जाधवचे युट्युबवर ५६ लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स असून, त्याच्या या अटकेने सोशल मीडिया विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

रुग्णवाहिकेचा वापर करून तस्करी

७ जानेवारी रोजी महासमुंद पोलिसांनी संशयावरून एका रुग्णवाहिकेची झडती घेतली होती. या तपासणीत पोलिसांना धक्काच बसला. रुग्णवाहिकेतून तब्बल ५ क्विंटल २० किलो गांजा जप्त करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या गांजाची किंमत सुमारे २ कोटी ६० लाख रुपये इतकी आहे. सुरुवातीला ३ तस्करांना अटक करण्यात आली होती, मात्र त्यांच्या चौकशीतून या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड आकाश जाधव असल्याचे उघड झाले.

सर्पमित्र ते तस्करीचा मास्टरमाइंड

आकाश जाधव हा महाराष्ट्रातील अहिल्यापूर येथील रहिवासी आहे. सोशल मीडियावर तो स्वतःला पर्यावरण प्रेमी आणि स्नेक रेस्क्यूअर असल्याचे दाखवायचा. सापांचे रेस्क्यू करतानाचे त्याचे व्हिडिओ लाखो लोक पाहायचे. मात्र, याच लोकप्रियतेच्या आणि विश्वासाच्या आडोशाने तो ओडिशावरून महाराष्ट्रात गांजाची तस्करी करत होता. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने गेल्या वर्षभरात ६ ते ७ वेळा अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात गांजाची ने-आण केली आहे.

असे फुटले तस्करीचे जाळे

अँटी नारकोटिक्स टास्क फोर्स आणि कोमाखान पोलिसांनी केलेल्या या संयुक्त कारवाईत आतापर्यंत एकूण ९ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यात गांजाची घाऊक विक्री करणारे, वाहतूक करणारे आणि किरकोळ पुरवठा करणारे अशा सर्वांचा समावेश आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी रुग्णवाहिकेचा वापर केला जात असे, जेणेकरून कोणत्याही चेकपोस्टवर संशय येणार नाही.

आकाश जाधवचे इंस्टाग्रामवर ३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याची ही क्लीन इमेज तस्करीच्या व्यवसायासाठी सुरक्षित कवच ठरत होती. तो पुण्यात गांजाची मोठी खेप पोहोचवणार होता, त्यापूर्वीच छत्तीसगड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईनंतर आता सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Web Title : सांप बचाने वाला यूट्यूबर करोड़ों के गांजे की तस्करी में गिरफ्तार।

Web Summary : सांपों को बचाने के लिए मशहूर यूट्यूबर आकाश जाधव को छत्तीसगढ़ में गांजे की तस्करी के आरोप में गिरफ्तार किया गया। उसने ओडिशा से महाराष्ट्र तक करोड़ों के ड्रग्स परिवहन के लिए एक एम्बुलेंस का इस्तेमाल किया। 5.6 मिलियन ग्राहकों वाले जाधव और आठ अन्य पर आरोप लगे हैं।

Web Title : Snake rescuer Youtuber arrested for smuggling cannabis worth crores.

Web Summary : YouTuber Akash Jadhav, famed as a snake rescuer, was arrested in Chhattisgarh for smuggling cannabis. He used an ambulance to transport the drugs, worth crores, from Odisha to Maharashtra. Jadhav, with 5.6 million subscribers, faces charges along with eight others.