खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 12:24 IST2025-06-12T12:22:16+5:302025-06-12T12:24:05+5:30
पंजाबमधील भटिंडा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
पंजाबमधील भटिंडा येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आदेश मेडिकल युनिव्हर्सिटीच्या पार्किंगमध्ये एका कारमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला आहे. तरुणी लुधियानाची रहिवासी आहे. ती इन्फ्लुएन्सर असून तिच्या वादग्रस्त विधानांसाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भटिंडा येथील आदेश मेडिकल युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये पार्क केलेल्या कारमध्ये तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. ही कार बराच वेळ युनिव्हर्सिटीच्या पार्किंगमध्ये उभी होती, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. कारचा दरवाजा उघडला असता, तरुणीचा मृतदेह आतमध्ये दिसला.
कांचन उर्फ कमल असं तरुणीचं नाव आहे. ती लक्ष्मण नगर, लुधियाना येथील रहिवासी होती. मृतदेह असलेली कार कांचनच्या नावावर आहे. प्राथमिक तपासात, शरीराव कोणत्याही जखमांच्या खुणा आढळल्या नाहीत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचन सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह होती. तिचे लाखो फॉलोअर्स होते.
कांचन अनेक वादातही अडकली होती. तिच्या अनेक पोस्ट आणि व्हिडिओ चर्चेत आहेत, ज्यामुळे तिचे अनेक लोकांशी मतभेद होते. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे आणि पोलीस प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल.