शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

...तर लोकप्रतिनिधी या नात्यानं तुमचीही जबाबदारी नाही का?; हायकोर्टाचा नवाब मलिकांना प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 5:15 PM

Dnyandev Wankhede Defamation Suit in HC : आज सुनावणी पार पडली असून समीर वानखेडे यांच्याविरोधात ट्विटवर अपलोड केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळलीत का? असा सवाल विचारत नवाब मलिक यांना अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यावर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सोमवारी दिले होते. त्यावर काल वानखेडेंच्या दाव्यात तथ्य नसल्याचं नवाब मलिकांनी हायकोर्टात स्पष्टीकरण दिले. पूर्व परवानगीशिवाय दाखल केलेली याचिका फेटाळून लावण्याची विनंती मलिकांनी हायकोर्टाकडे केली. त्यावर आज सुनावणी पार पडली असून समीर वानखेडे यांच्याविरोधात ट्विटवर अपलोड केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळलीत का? असा सवाल विचारत नवाब मलिक यांना अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. तर ज्ञानदेव वानखेडे यांना ट्विट्स खोटे आहेत, हे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. 

समीर वानखेडेंसोबत वाद असताना, त्यांची बहीण, मेव्हणीवर आरोप करण्याचं कारण काय?, यासंदर्भात आम्ही कायदेशीर नोटीसही पाठवली आहे असा वानखेडेंनी हायकोर्टात दावा केला. त्यावर तुम्ही या घडीला केवळ होत असलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध करा, तुमचा मुलगा एक सरकारी कर्मचारी आहे, तेव्हा सवाल उठणारच असे हायकोर्ट म्हणाले. आपण समीर वानखेडेंचा जन्म दाखला, काही फोटो दाखवले, मात्र ते आधीच जाहीर झालेलं आहे. आपण फक्त ती पुन्हा जारी केली असा नवाब मलिकांच्यावतीनं दावा करण्यात आला. मात्र, असं करताना त्याची सत्यता तुम्ही पडताळून पाहिली होती का? असा प्रश्न हायकोर्टाने उपस्थित केला. तसेच एक लोकप्रतिनिधी आणि एका राष्ट्रीय पक्षाचे नेते या नात्यानं तुमचीही तितकीच जबाबदारी नाही का? असे हायकोर्टाने नवाबांना खडसावले. त्यावर आपल्याला जेवढी माहिती आहे. त्यानुसार ही सर्व माहिती खरी आहे, असा नवाब मलिकांच्यावतीनं हायकोर्टात दावा करण्यात आला.

हायकोर्टाने वानखेडे आणि मलिक या दोघांनाही अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मलिकांना जाहीर केलेली माहिती खरी आहे हे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले तर वानखेडेंना हे आरोप चुकीचे आहेत हे सिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याप्रकरणी सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. मलिक यांनी प्रेस रिलीज, मुलाखती आणि समाजमाध्यमांद्वारे वानखेडे कुटुंबियांवर केलेल्या टिप्पण्या छळवणूक करणाऱ्या व बदनामीकारक असल्याचे जाहीर करावे आणि त्यापोटी १.२५ कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती ज्ञानदेव वानखेडे यांनी दाव्यात केली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnawab malikनवाब मलिकSameer Wankhedeसमीर वानखेडे