शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

...म्हणून इक्बाल मिर्चीच्या मालमत्तांच्या लिलावाकडे कोणी फिरकलेच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2019 19:58 IST

आजचा लिलाव अयशस्वी ठरला आहे. 

ठळक मुद्दे इक्बाल मिर्चीच्या सांताक्रूझ पश्चिम येथे मिल्टन अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 501 आणि 502 साठी बोली लावण्यात येणार होती. या दोन्ही फ्लॅटचा लिलावा आज सफेमाच्या नरीमन पाँईट येथील कार्यालयात होणार होता. मात्र, लिलावात कोणी सामील न झाल्याने लिलाव पूर्ण झाला नाही. 

मुंबई - मृत गॅंगस्टर इक्बाल मिर्चीच्या मालमत्तेच्या लिलावास आज सकाळी सुरुवात झाली. सांताक्रूझ पश्चिमेकडील दोन फ्लॅट आणि इतर ठिकाणी ४ मालमत्तामुंबई इक्बाल मिर्ची (इक्बाल मिर्ची) आणि त्याच्या कुटुंबातील अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या कुटुंबातील मालमत्तांचा लिलाव अयशस्वी ठरला आहे. त्यांचा तस्करी व परकीय चलन विनिमय कायद्यांतर्गत (सफेमा) लिलाव होणार होता. मंगळवारी इक्बाल मिर्चीच्या सांताक्रूझ पश्चिम येथे मिल्टन अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक 501 आणि 502 साठी बोली लावण्यात येणार होती. परंतु फ्लॅटची रक्कम जास्त असल्यामुळे कोणी लिलावात भाग घेतला नाही. जास्त किंमतीमुळे कोणीही ही संपत्ती विकत घेण्यास इच्छुक नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आजचा लिलाव अयशस्वी ठरला आहे. इक्बाल मिर्चीच्या वादग्रस्त मालमत्तेचा आज ईडीकडून  (स्मगलर्स  अँड फॉरेन  मॅनिप्युलेटर्स  ऑथीरिटीमार्फत)सफेमानुसार या मालमत्तेचा लिलावा होणार होता. लिलावा करण्यात येणाऱ्या मालमत्तेची किंमत तीन कोटी ४५ लाख रुपये इतकी असून १२४५ चौरस फुटांचे हे दोन फ्लॅट आहेत. सांताक्रूझ येथील जुहूतारा रोड येथे इक्बाल मिर्चीचे हे दोन अलिशान फ्लॅट आहेत.  सध्या या दोन्ही फ्लॅटची किंमत तीन कोटी ४५ लाख इतकी आहे. या दोन्ही फ्लॅटचा लिलावा आज सफेमाच्या नरीमन पाँईट येथील कार्यालयात होणार होता. मात्र, लिलावात कोणी सामील न झाल्याने लिलाव पूर्ण झाला नाही. 

काही महिन्यांपूर्वी याच सफेमाच्या कार्यालयात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मालमत्तेचा लिलावा करण्यात आला होता. या प्रकरणी ईडीने उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला समन्स बजावले आहे. राज कुंद्राची ३० ऑक्टोबरला मुंबईतील ईडी कार्यालयात आठ तास चौकशी करण्यात आली. त्याआधी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांची देखील ईडीने चौकशी केली.  

किती आहे मिर्चीची संपत्ती ?

१९९४ साली पोलिसांनी इक्बाल मिर्चीला तडीपार म्हणून घोषित केले. त्यावेळी तो दाऊदचा अमली पदार्थ तस्करीचा व्यवसाय संभाळायचा. कालांतराने मिर्चीने भारतातून पळ काढला. त्याला पकडण्यासाठी इंटरपोलकडून नोटीस काढण्यात आली. सौदी अरेबियात जाऊन लपलेला मिर्ची कालांतराने कुटुंबासोबत लंडन येथे स्थायिक झाला. त्या ठिकाणी तो लिगल इस्टेटचा व्यवसाय करू लागला. मात्र, १४ ऑगस्ट २०१३ रोजी त्याचा मृत्यू झाला. मुंबईत त्याच्या व त्याच्या कुटुंबियांच्या नावे पाच मालमत्ता असल्याचे कुटुंबियांच्या चौकशीतून उघड झाली आहे. यातील दोन मालमत्ता मे.सनब्लिक व मिलेनियम डेव्हलपर्स प्रा.लि.यांना विकण्यात आल्या. वरळीत २०११ मध्ये सनब्लिक रिअल्टर्सला विकण्यात आल्या. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयDawood Ibrahimदाऊद इब्राहिमMumbaiमुंबई