शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

... म्हणून फार्मा कंपनीच्या संचालकास ताब्यात घेतलं, मुंबई पोलिसांचं अधिकृत स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 5:54 PM

Mumbai Police on Remdesivir : निर्यातीसाठी ठेवलेला रेमडेसीवीर ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया किंवा एफडीआय यांच्या परवानगीशिवाय स्थानिक बाजारात वळविला जाऊ शकत नाही. 

ठळक मुद्दे चैतन्य यांनी पुढे अशी माहिती दिली की, विशेष माहितीनुसार कारवाई करताना १७ एप्रिल रोजी फार्मास्युटिकल कंपनीच्या संचालकास बीकेसी पोलीस स्टेशनने चौकशीसाठी बोलावले होते.

रेमडेसीवीर इंजेक्शन प्रकरण  (Remdesivir injection) कमालीचे तापले असून रात्री उशिरा राज्यात मोठी घडामोड घडली आहे. दमणच्या ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबईपोलिसांनी ताब्यात घेतले होते. यामुळे भाजपाचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadanvis)आणि विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर  (Pravin Darekar) यांनी तातडीने मुंबई पोलीस उपाआयुक्त मंजुनाथ सिंगे यांची भेट घेत जाब विचारला.  त्यानंतर मुंबईपोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी एस. चैतन्य यांनी सांगितले की, मुंबई पोलीसांकडे फार्मास्युटिकल कंपनीने मोठ्या प्रमाणात ( ६०,००० कुप्या ) रेमडेसीवीर औषध साठवल्याची विशेष माहिती होती. भारत सरकारच्या रेमडेसीवीर या औषधाच्या निर्यातीवरील विद्यमान बंदीमुळे रेमडेसीवीरचा हा साठा निर्यात करता आला नाही. कोव्हिड १९ पॉझिटिव्ह रूग्णांसाठी रेमडेसीवीर हे एक जीवनरक्षक औषध मानले जाते.चैतन्य यांनी पुढे अशी माहिती दिली की, विशेष माहितीनुसार कारवाई करताना १७ एप्रिल रोजी फार्मास्युटिकल कंपनीच्या संचालकास बीकेसी पोलीस स्टेशनने चौकशीसाठी बोलावले होते. बीकेसी पोलीस स्टेशनमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) पथक होते. एफडीएचे आयुक्त व सह आयुक्त यांनाही याची माहिती होती. त्याच दिवशी रात्री ११.१५ वाजता विरोधी पक्षनेते (विधानसभा) देवेंद्र फडणवीस,  विरोधी पक्षनेते (विधान परिषद) प्रवीण दरेकर, आमदारपराग अळवणी आणि प्रसाद लाड यांनी बीकेसी पोलीस स्टेशनला भेट दिली. देवेंद्र फडणवीस यांनी फार्मास्युटिकल कंपनीच्या संचालकांना पोलीस स्टेशनमध्ये का बोलावले याची चौकशी केली ते म्हणाले की, रेमडेसीवीर कुपींचा साठा महाराष्ट्र शासनास देण्यास एफडीए आयुक्तांकडुन परवानगी घेण्यात आली होती, कारण निर्यातीसाठी ठेवलेला रेमडेसीवीर ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया किंवा एफडीआय यांच्या परवानगीशिवाय स्थानिक बाजारात वळविला जाऊ शकत नाही. 

एफडीएकडुन फार्मास्युटिकल कंपनीला दिलेली माहिती बीकेसी पोलीस ठाण्यास कळविण्यात आली नाही, जे त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीवर स्वतंत्रपणे वागत होते. मुंबई पोलीसांनी सद्भावनेने काम केले तथ्यांद्वारे विशिष्ट माहितीच्या आधारावर जीवनरक्षक औषध रेमडेसीवीरची मोठ्या प्रमाणात म्हणजेच ६०,००० कुपी शोधून काढण्यासाठी औषधनिर्माण कंपनीच्या संचालकांना चौकशीसाठी बोलावले होते. रेमडेसीवीरच्या बेकायदेशीर होर्डिंग्ज, काळ्याबाजाराच्या तक्रारी आणि नागरिकांना होणारी टंचाई या तक्रारींच्या अनुषंगाने ही चौकशी आवश्यक होती. सदरची वस्तुस्थिती विरोधी पक्षनेते यांना समजावून सांगितली. बेकायदेशीरपणे रेमडेसीवीर होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांना देण्यात आली नमुद ठिकाणी मुंबई पोलीसांचे वरिष्ठ अधिकारी हजर होते फार्मास्युटिकल कंपनीच्या संचालकांकडे चौकशी करून त्यांना जाऊ देण्यात आले आणि नंतर जेव्हा जेव्हा त्यांना बोलावण्यात येईल तेव्हा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसpravin darekarप्रवीण दरेकरPrasad Ladप्रसाद लाडcorona virusकोरोना वायरस बातम्या