पिंपळे सौदागर येथे सहा वर्षांच्या विद्यार्थिनीला शिक्षकाची मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 13:42 IST2018-10-27T13:40:43+5:302018-10-27T13:42:18+5:30

पिंपळे सौदागर येथील युकेजीच्या वर्गात शिकणाऱ्या सहा वर्षांच्या बालिकेला शिक्षकाने अभ्यास केला नाही म्हणन मारहाण केली.

A six-year-old student beaten by teacher in Pimpale Sadadagar | पिंपळे सौदागर येथे सहा वर्षांच्या विद्यार्थिनीला शिक्षकाची मारहाण

पिंपळे सौदागर येथे सहा वर्षांच्या विद्यार्थिनीला शिक्षकाची मारहाण

ठळक मुद्दे केअर आॅफ प्रोटेकशन आॅफ चिल्ड्रेन या कायद्यानुसार शिक्षकावर गुन्हा दाखल

पिंपरी : पिंपळे सौदागर येथील युकेजीच्या वर्गात शिकणाऱ्या सहा वर्षांच्या बालिकेला शिक्षकाने अभ्यास न केल्याच्या कारणामुळे मारहाण केली. याप्रकरणी पालकांनी फिर्याद दिली असून शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोमल दीपक पवार (वय २५), यांनी फिर्याद दाखल केली आहे. लक्ष्मीनगरच्याअभिलाषा फेरीटल स्कुलच्या शिक्षकाविरुद्ध सांगवी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादींची मुलगी देविका हिला अभ्यास केला नाही म्हणून शिक्षकाने गालावर चापट मारली. तसेच हातातील प्लास्टिक पट्टीने पायावर मारले. त्यामुळे दुखापत झाली. केअर आॅफ प्रोटेकशन आॅफ चिल्ड्रेन या कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक एस एस सूर्यवंशी या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: A six-year-old student beaten by teacher in Pimpale Sadadagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.