दुचाकी अपघातात भावाचा मृत्यू तर बहीण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 21:51 IST2018-10-19T21:51:15+5:302018-10-19T21:51:29+5:30
प्रतीकाच्या मागे बसलेल्या बहिणीस गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात उपचार सुरु आहे. याबाबत विक्रोळी पोलीस ठाण्यात याबाबत अपमृत्यूची आणि अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

दुचाकी अपघातात भावाचा मृत्यू तर बहीण गंभीर जखमी
मुंबई - विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्व द्रुतगती महामार्गावर ऐरोली उड्डाण पुलावर काल सायंकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. गोवंडीत झेंडे गार्डनजवळ राहणाऱ्या दुचाकी चालक प्रतीक सुरेंद्र लोंढे (वय २२) याचा अपघातात मृत्यू झाला. तर मागे बसलेली प्रणाली लोंढे (वय २०) ही गंभीर जखमी झाली आहे. प्रतीक दुचाकी (एमएच ०१, सीबी ४३३७) वरून निष्काळजीपणे, भरधाव वेगाने जात असताना त्याचा ताबा सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर आदळून खाली पडला आणि जबर मार लागून प्रतीकचा जागीच मृत्यू झाला. तसेच प्रतीकाच्या मागे बसलेल्या बहिणीस गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात उपचार सुरु आहे. याबाबत विक्रोळी पोलीस ठाण्यात याबाबत अपमृत्यूची आणि अपघाताची नोंद करण्यात आली आहे.