शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतल्या आश्रमात राहणाऱ्या गायिकेचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबाकडून चौकशीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 13:03 IST

Sangita Chakraborty Death: पश्चिम बंगालच्या एका गायिकेचा मुंबईत रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला.

Sangita Chakraborty Death: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या एका गायिकेचा मुंबईत धक्कादायकरित्या मृत्यू झाला. गायिकेचा मृत्यू रहस्यमय परिस्थितीत झालेल्या विविध चर्चा सुरु झाल्या आहे. मृत गायिका मुंबईतील एका आश्रमात राहत होती. दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. सोमवारी तिच्या कुटुंबाला फोनवरून तिचा अपघात झाल्याची माहिती देण्यात आली, नंतर तिच्या मृत्यूची बातमी आली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, धरणाच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला, मात्र या घटनेने अनेक प्रश्नही उपस्थित केले आहेत.

पश्चिम बंगालमधील हुगळी येथील रहिवासी असलेली गायिका संगीता चक्रवर्तीचा मुंबईत मृत्यू झाला. मृत संगीता मुंबईतील मनाडी परिसरातील एका योग आश्रमात राहत होती. संगीताच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे संगीता चक्रवर्तीच्या मृत्यूचे गूढ अधिकच वाढत चालले आहे. संगीताच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली. तृणमूल काँग्रेसचे आमदार असित मजुमदार आणि नगरसेवक इंद्रजित दत्त यांनी पोलिसांनी या घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. 

आमदार असित मुजुमदार यांनी सांगितले की स्थानिक नेत्यांनी संगीताच्या मृत्यूची माहिती दिली. आमच्या परिसरातील एका मुलीचा तलावात बुडून मृत्यू झाला. ती मुलगी मुंबईतील संगीत उद्योगाशी संबंधित होती, असं आमदार असित मुजुमदार यांनी म्हटलं. असित मजुमदार यांनी पोलिसांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि गायिकेच्या मृत्यूचे कारण समोर आणावं अशी मागणी केली आहे.

तृणमूलच्या नेत्यांनी स्थानिक पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून संगीताच्या वडिलांशी फोनवर चर्चा केली. संगीताचे वडील तिचा मृतदेह घेऊन मुंबई विमानतळावरुन हुगळीसाठी रवाना झाले आहेत.  ती स्वभावाने खूप सौम्य आणि सुसंस्कृत होती. तिला गाणे आणि वादन करण्याची आवड होती आणि तिने अनेक स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला होता. धरणामध्ये आंघोळ करताना ती पाण्यात बुडाली, पण ही घटना कशी घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संगीता एक हुशार आणि प्रतिभावान मुलगी होती. तिच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे अनेक शंका निर्माण होत आहेत, असं तिच्या शेजाऱ्यांनी सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईCelebrityसेलिब्रिटीDeathमृत्यू