भुसावळ येथे एकाचवेळी पाच सट्टा पेढ्यांवर छापे, नऊ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 22:04 IST2020-12-14T22:03:16+5:302020-12-14T22:04:18+5:30
Raid : ४८ हजाराच्या रोकडसह साहित्य जप्त

भुसावळ येथे एकाचवेळी पाच सट्टा पेढ्यांवर छापे, नऊ जणांना अटक
भुसावळ (जि.जळगाव) : स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांनी एकाचवेळी पाच सट्टा पेढ्यांवर छापे टाकले. यात नऊ आरोपींना अटक केली तसेच ४८ हजार ८० रुपयांच्या रोकडसह साहित्य जप्त करण्यात आले. सोमवारी दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेदरम्यान विविध भागात ही धडक कारवाई करण्यात आली.
नाहटा चौफुलीजवळील दिनदयाल नगर, अष्टभूजा देवी मंदिर परिसर, कंजरवाडा आठवडे बाजार, सोनिच्छावाडी येथे दोन अशा पाच ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. याबाबत बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कृष्णा महालेकर, संदीप अशोक चौधरी, रवींद्र रामदास वारके, संतोषलाल गिरीलाल, गोपाल द्वारकादास अग्रवाल, प्रल्हाद हरी सपकाळे, छोटेलाल ब्रिजलाल, संतोष शंकर तायडे, मारोती वेडू भालेराव अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.