शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

Sujay Vikhe: खासदार सुजय विखे अडचणीत; श्रीरामपूरचे डीवायएसपी संदीप मिटकेंकडून रेमडेसीवीर प्रकरणाचा तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2021 12:52 IST

MP Sujay Vikhe Remdesivir case: खासदार सुजय विखे यांनी विशेष विमानाने रेमडेसिविर आणल्यानंतर याची राज्यभर चर्चा झाली होती. सर्वसामान्यांना इंजेक्शन मिळत नसताना खासदार विखे यांना एवढ्या मोठ्या संख्येने इंजेक्शन कसे मिळाले, असा आक्षेप घेत काही जणांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

श्रीरामपूर : भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे (MP Sujay Vikhe patil) यांनी दिल्लीवरून विमानाने आणलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शन प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे हा तपास सोपविला आहे. (MP Sujay Vikhe Remdesivir case probe will conduct by Shrirampur DYSP Sandeep Mitke. )

 खासदार डॉ.सुजय विखे यांनी खरेदी केलेल्या रेमडेसिविर प्रकरणाचा तपास श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून शिर्डी विमानतळावरील खासगी विमानांचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यासाठी शुक्रवारी मिटके हे विमानतळावर दाखल झाले होते. या प्रकरणाच्या तपासाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी उपअधीक्षक मिटके यांच्याकडे प्रकरणाचा तपास सोपविला. जिल्ह्यात गाजलेल्या राहुरी येथील पत्रकार दातीर खून प्रकरणाचा मिटके यांनी नुकताच छडा लावला होता. आता राज्यभर चचर्चेत आलेल्या खासदार डॉ.सुजय विखे यांच्या रेमडेसिविर खरेदी प्रकरणाचा तपासही मिटके यांच्याकडे देण्यात आला आहे. 

खासदार डॉ.विखे यांनी दिल्लीवरून विमानाने रेमडेसिविर आणल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांनी रान पेटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात या इंजेक्शन खरेदीवर आक्षेप घेत याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. गृह विभागाच्या प्रधान सचिवांना शिर्डी विमानतळावर १० एप्रिल ते २५ एप्रिलपर्यंत आलेल्या सर्व खासगी विमानांचे सीसीटीव्ही फुटेज आणि रेकॉर्ड जतन करण्याचे आदेश दिले आहेत. 

याबाबत उपअधीक्षक मिटके यांना लोकमतने विचारले असता जिल्हा पोलीस प्रमुखांना तपास सोपविल्याचे त्यांनी सांगितले. प्रकरणाच्या तपासाकरिता शिर्डी विमानतळावरच आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विखे काय म्हणालेले...

विखे यांनी विशेष विमानाने इंजेक्शनचा साठा शिर्डीत उतरविला व तो वाटपही केला. यातील प्रत्येकी शंभर इंजेक्शन त्यांनी शिर्डीचे साईबाबा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयाला मोफत दिली.  विखे म्हणाले की, ‘आपल्या मैत्रीचा वापर करत आपण थेट विमानाने इंजेक्शन आणली. त्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांचीही मदत घेतली. हे करत असताना गरिबांसाठी माझ्यावर कारवाई झाली तरी चालेल. त्यामुळेच मुद्दामहून इंजेक्शनचे वाटप झाल्यानंतर व्हिडिओ जाहीर करत आहे.’ विखे यांनी गत सोमवारी विमानाने हा साठा आणला. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा उतरविला. तो कोठून आणला व किती इंजेक्शन आणली हे त्यांनी जाहीर केलेले नाही.

टॅग्स :Sujay Vikheसुजय विखेremdesivirरेमडेसिवीरshirdiशिर्डीPoliceपोलिस