भिवंडी बाजारपेठेतील दुकानांना भीषण आग; आगीत चार दुकाने जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 15:49 IST2021-08-22T15:48:55+5:302021-08-22T15:49:41+5:30

Fire Case :या भीषण आगीत इमारतीमधील कपडे, लेडीज टेलर, साड्या, महिलांचे कपडे अशी चार दुकाने जळून खाक झाली आहे.

Shops in Bhiwandi market on fire; Four shops were gutted in the fire | भिवंडी बाजारपेठेतील दुकानांना भीषण आग; आगीत चार दुकाने जळून खाक

भिवंडी बाजारपेठेतील दुकानांना भीषण आग; आगीत चार दुकाने जळून खाक

ठळक मुद्देभिवंडीत आगीचे सत्र सुरूच असून आज सकाळच्या  सुमारास पारनाका भागातील बाजारपेठेत मध्ये असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एका दुकानात आग लागली होती.

 नितिन पंडीत

भिवंडी - शहरातील पारनाका परिसरात असलेल्या  बाजार पेठेमधील एका इमारतीच्या तळमजल्यावर भीषण आग लागल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे. या भीषण आगीत इमारतीमधील कपडे, लेडीज टेलर, साड्या, महिलांचे कपडे अशी चार दुकाने जळून खाक झाली आहे.

भिवंडीत आगीचे सत्र सुरूच असून आज सकाळच्या  सुमारास पारनाका भागातील बाजारपेठेत मध्ये असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एका दुकानात आग लागली होती. मात्र  सकाळच्या सुमारास इतर दुकाने बंद असल्याने हि आग त्या इतरही दुकानांपर्यत पसरून आगीच्या भक्षस्थानी चार दुकाने पडली. दुसरीकडे या भीषण आगीमुळे इमरतीत राहणाऱ्या रहिवाश्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच  घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल होऊन  एका तासात आग आटोक्यात आली.  मात्र कपड्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत कपडे व दुकाने जळून खाक झाली असून ही आग शॉटसर्किटने लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Web Title: Shops in Bhiwandi market on fire; Four shops were gutted in the fire