Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 11:28 IST2025-11-18T11:27:46+5:302025-11-18T11:28:40+5:30
Delhi Blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या एनआयएच्या तपासात अनेक महत्त्वाचे खुलासे समोर येत आहेत.

फोटो - आजतक
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कारस्फोटाच्या एनआयएच्या तपासात अनेक महत्त्वाचे खुलासे समोर येत आहेत. हमाससारख्या भयंकर हल्ल्यासाठी एक खूप मोठं नेटवर्क प्लॅन करत असल्याचं आता समोर आलं आहे. या संपूर्ण मॉड्यूलमध्ये उमर आमिर आणि जसीर बिलाल उर्फ दानिश हे सर्वात प्रमुख व्यक्ती होते.
तपास संस्थांच्या मते, हा कट फक्त कार बॉम्बपुरता मर्यादित नव्हता. हा ट्रिपल लेयर अटॅकचा प्लॅन होता, ज्यामध्ये ड्रोन, रॉकेट आणि शेवटी कार बॉम्बचा समावेश होता. हमास इस्रायलमध्ये आणि आयएसने सीरिया-इराकमध्ये हाच पॅटर्न होता. हवेतून आणि जमिनीवरून एकाच वेळी हल्ले करण्यात आले. एनआयएच्या सुरुवातीच्या तपासात असं आढळून आलं की उमर आणि जसीर अनेक महिन्यांपासून ड्रोन शस्त्रास्त्र बनवण्याचं काम करत होते.
नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
दानिशकडे तांत्रिक कौशल्य होतं. तो ड्रोनचे इलेक्ट्रॉनिक पार्ट, मोटर आणि लोड कॅपेसिटर यामध्ये बदल करून त्यावर स्फोटके बसवू शकेल असा सेटअप तयार करत होता. तपास अधिकाऱ्यांच्या मते, हा प्लॅन हमास मॉडेलसारखाच होता. सुरुवातीला ड्रोन वापरून वरून हल्ला करायचा होता. तपास अधिकाऱ्यांच्या मते, रॉकेट देखील तयार केले जात होते.
दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
एनआयएच्या मते, जसीर बिलालची अटक ही या कटातील एक महत्त्वाची गोष्ट होती. ड्रोन आणि रॉकेट दोन्हीसाठी टेक्निकल सपोर्टसाठी मॉड्यूलमध्ये त्याचा समावेश होता. तपासात असं दिसून आलं की, रॉकेट लाँचरसारखी मॅन्युअल ट्यूब विकसित केली जात होती. त्याची चाचणी एका लहान स्फोटक उपकरणाने करण्यात आली.
जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
दिल्लीसह देशभरात ३२ कार वापरुन साखळी बॉम्बस्फोटचं प्लॅनिंग? दहशतवाद्यांबद्दल मोठा दावा
लाँच रेंज सुमारे 300-400 मीटर असण्याचा अंदाज होता. हे सर्व सुरुवातीच्या टप्प्यात होतं. परंतु योजना स्पष्ट होती. एकतर ड्रोन हल्ला किंवा रॉकेट हल्ला. याचा अर्थ असा होता की, दिल्लीमध्ये पहिला रॉकेट-आधारित दहशतवादी हल्ला झाला असता. ड्रोन आणि रॉकेटसह दोन्ही प्रयत्न अयशस्वी झाल्यावर मॉड्यूलने कार बॉम्बचा तिसरा आणि अंतिम पर्याय स्वीकारला आणि याच स्फोटाने दिल्ली हादरली.