धक्कादायक...अनैसर्गिक लैंगिक शोषण करून पत्नीला मारहाण करणारा युवा सेना पदाधिकारी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 20:36 IST2018-08-02T20:29:42+5:302018-08-02T20:36:39+5:30

कोळसेवाडी पोलिसांनी केली आरोपी पतीला अटक; सोमवारपर्यंत पोलीस कोठडी 

Shocking ... Yova sena worker assaulted wife by unnatural sexual abuse | धक्कादायक...अनैसर्गिक लैंगिक शोषण करून पत्नीला मारहाण करणारा युवा सेना पदाधिकारी अटकेत

धक्कादायक...अनैसर्गिक लैंगिक शोषण करून पत्नीला मारहाण करणारा युवा सेना पदाधिकारी अटकेत

कल्याण - पत्नीसोबत  मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकारी  संजय मोरेला कोळशेवाडी पोलिसांनीअटक केली आहे. तो युवा सेनेचा कल्याण पूर्व शहर पदाधिकारी आहे.  न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

 ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अशा तत्वावर काम करणाऱ्या शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्याने अशा प्रकारचे कृत्य केल्याने कल्याणमध्ये राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचा युवा सेना पदाधिकारी संजय मोरे पत्नीवर पाच महिन्यांपासून अनैसर्गिक लैंगिक शोषण करून अत्याचार करत होता. कल्याणचे खासदर श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरा दरम्यान वैद्यकीय अहवालामध्ये पत्नीची तब्येत खालावल्याचे समोर आले. वैद्यकीय अहवाल असा का आला यावरून त्याने पत्नीला बेदम मारहाण केली. या पीडित महिलेने आपल्या पतीने केलेल्या अत्याचाराबाबत शिवसेनेच्या सर्व नेत्यांकडे धाव घेतली होती. मात्र, त्यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही. अखेर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेतल्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी या युवा सेना पदाधिकाऱ्याला अटक केली आहे.

सध्या डोंबिवलीत राहणाऱ्या महिलेचा आरोप आहे की कल्याण पूर्वेतील विजय नगर येथे राहणारा तिचा पती  तिच्यावर गेल्या 5 महिन्यांपासून अत्याचार करत आहे. तिला त्रास देण्यासाठी त्याने तिच्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले होते. या विकृत इसमाचा त्रास येथेच थांबला नाही.  कल्याण लोकसभेचे खासदार यांनी कल्याण पूर्वेत आरोग्य शिबिराचा आयोजन केले होते.  या शिबिरात या महिलेचे तपासणीदरम्यान या महिलेची प्रकृती खालावल्याचे समोर आले. या महिलेने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना पतीकडून होत असलेल्या अत्याचाराबाबत सांगितले. मात्र, कुणीही तिला मदत केलीच नाही. उलट पक्षातील लोकांनी तिच्यावर तक्रार न करण्यासाठी राजकीय दबाव टाकत होते. अखेर या महिलेने पोलीस अधिकाऱ्याकडे दाद मागितली. कोळशेवाडी पोलिसांनी  या प्रकरणी गुन्हा दाखल करत शिवसेना युवा सेना शहर अधिकारी याला अटक केली आहे.

Web Title: Shocking ... Yova sena worker assaulted wife by unnatural sexual abuse